Join us  

MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही!

धोनी सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मात्र असे असताना देखील राजस्थानविरुद्ध तो फलंदाजीला आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:49 PM

Open in App

राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवताना तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला ३२ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २०२ धावा केल्यानंतर चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७० धावांवर रोखले. चेन्नईच्या या पराभवानंतर चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला न आल्याने नेटकऱ्यांनी काही सवाल उपस्थित केले. 

धोनी सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मात्र असे असताना देखील राजस्थानविरुद्ध तो फलंदाजीला आला नाही. तर त्याने रायडू, जाडेजा, शिवम दुबे यांना संधी दिली. परंतु चांगल्या फॉर्मात असताना धोनीने स्वत: फलंदाजीसाठी यायला हवे होते, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही सवालही उपस्थित करण्यात आले होते. यावर चेन्नई संघाचा प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

धोनीला फलंदाजी करायची आहे. प्रत्येक फलंदाज त्याच्यापेक्षा वरच्या ऑर्डरवर फलंदाजी करतो. आणि तो स्वत: खालच्या ऑर्डरमध्ये फलंदाजीची जबाबदारी घेतो कारण त्याला जाडेजा, रायडू, दुबे सारख्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे, असं ब्राव्होने सांगितले. राजस्थानविरुद्ध पराभवानंतरही ड्रेसिंग रूममधील खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले असून, विजयी मालिका सुरू ठेवण्याची क्षमता त्याच्या संघात असल्याचे ब्राव्होने स्पष्ट केले. 

लखनौ सुपरजायंट्सने दणदणीत विजय

चौकार-षट्कारांचा पाऊस पाडत एकतर्फी ठरविलेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दणदणीत विजय मिळवताना पंजाब किंग्जचा ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारताना २० षटकांत ५ बाद २५७ धावा केल्या. यानंतर त्यांनी पंजाबला १९.५ षटकांत २०१ धावांत गुंडाळले.

पाहा Points Table

लखनौ आणि पंजबाच्या या सामन्यानंतर गुणातालिकेत लखनौने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत आता ४ संघ १० गुणांवर आहे. पहिल्या स्थानावर राजस्थान असून दुसऱ्या स्थानावर लखनौ आहे. गुजरात तिसऱ्या क्रमांकावर , तर चेन्नई १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. बंगळुरु ८ गुणांसह पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या स्थानावर आहे. तर मुंबई ६ गुणांसह आठव्या, हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App