Join us  

महेंद्रसिंग धोनीचं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पाऊल; पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात

भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:21 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं धोनीनं उचललेलं हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी दाखल झाला. लष्कराचं प्रशिक्षण मिळावं म्हणून धोनीनं भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती. निवड समितीनंही त्याची ही विनंती मान्य केली, शिवाय भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे.

IANS शी बोलतान सूत्रांनी सांगितले की,''धोनीनं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे आणि त्याचं लष्कराप्रती असलेलं प्रेमही सर्वांना माहित आहे. भारतीय लष्करासोबत काम करण्याची इच्छा गेली अनेक वर्ष धोनीच्या मनात होती, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला ते जमले नाही. पण, आता तो लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला आहे. त्याच्या या कृतीनं युवकांमध्ये लष्काराप्रती अधिक जागृतता निर्माण होणार आहे.''  

38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला.  2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.   'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीची '7' क्रमांकाची जर्सी निवृत्त होणार, कारण...भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे आणि ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.  

कसोटी क्रिकेटची प्रसिद्धी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटच्या जर्सीवरही खेळाडूचे नाव व क्रमांक लिहिण्याची मुभा दिली आहे. इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटीतून या नियमाची अंमलबजावणीही झाली. त्यामुळेच भारतीय संघाला कसोटी मालिकेत या नव्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता कसोटीतही जर्सीवर क्रमांक दिसणार असल्यानं 7 क्रमांकाची धोनीची जर्सी कोणाला मिळेल, याची उत्कंठा वाढली होती. पण, बीसीसीआयनं धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवानबीसीसीआयभारत विरुद्ध वेस्ट इंडिज