भारतीय संघाचा महान कर्णधार आणि स्टार यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. म्हणूनच त्याला कॅप्टन कूल म्हटले जाते. फार कमी वेळा धोनी रागावलेला दिसला आहे. ४२ वर्षीय धोनीने जवळपास १५ वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख ट्रॉफी जिंकणारा तो जगातील पहिला कर्णधार आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दित अनेक दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. धोनीसोबत खेळलेला जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याने कॅप्टन कूलबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. इशांतने धोनीच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. कपिल देव यांच्यानंतर भारताकडून १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी क्रिकेट खेळणारा इशांत हा दुसरा जलदगती गोलंदाज ठरला आहे. ३४ वर्षीय इशांतने त्याच्या कारकीर्दितील अनेक प्रसंग सांगताना महेंद्रसिंग धोनीबद्दलही अनपेक्षित विधान केले आहे.
''माही भाई ची एकच स्ट्रेंथ नाही.. तो कूल अजिबात नाही, मैदानावर तो खूप शिव्या घालतो, मला तर त्याने अनेकदा शिव्या दिल्या आहेत. त्याच्या खोलीत तो एकटाच कधी नसतो, तो झोपतो तेव्हाच काय तो एकटा असतो. त्याच्या अवतीभवती नेहमीच गराडा असतो. मग तो आयपीएलमध्ये खेळत असो किंवा भारतीय संघाकडून... त्याच्या खोलीत लोकं बसलेली असायची. गावामध्ये कशी चावडी भरते, तशी चावडी माही भाईच्या खोलीमध्ये असायची. तसंच फिल यायचं,''असे इशांत शर्माने एका यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. इशांतने भारताकडून १०५ कसोटी, ८० वन डे व १४ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ३११, ११५ व ८ विकेट्स घेतल्या आहेत.
तो पुढे म्हणाला,''कसोटी सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर, माही भाईने मला विचारले, थकलास का? मी हो म्हणालो. त्यावर म्हणाला बेटा आता तू म्हातारा झाला आहेस, सोडून दे. माहीला सर्वात जास्त चिडलेला मी पाहिलं आहे... तोही माझ्यावरच चिडला होता. तेव्हा त्याने मला शिव्या दिल्या होत्या.''
Web Title: MS Dhoni ground mein bahut gaali bakte hai, mere ko toh bahut baki hai, Say India pacer Ishant Sharma, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.