ठळक मुद्दे217 धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना CSKला 200 धावाच करता आल्यामहेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्या आधी फलंदाजीला सॅम कुरन व ऋतुराज गायकवाड यांना पाठवलेगौतम गंभीर, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग यांची टीका, MS Dhoniनं सांगितलं कारण
Indian Premier League ( IPL 2020) 13व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) 16 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत केले. 217 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni) 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावरून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं टीका केली. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनीही धोनीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ( Live Score & Updates )
Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका
महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?
IPL 2020 : CSKला धक्का; ड्वेन ब्राव्होनंतर आणखी एक मॅच विनर पुढील सामन्यांना मुकणार?
सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) 33 धावा करून माघारी परतला. फॅफ डू प्लेसिसनं ( Faf du Plessis) 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या. ( Live Score & Updates )
IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही!
सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, मिचेल मार्शची IPL2020तून माघार; विंडीजचा स्टार खेळाडू दाखल
पण, संघासमोर मोठे आव्हान असताना कर्णधार धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं, सर्वांना खटकलं. गावस्कर म्हणाले,''त्या सामन्यातील निर्णयाचं आपण अचूक विश्लेषण करू शकत नाही. त्यानं सॅम कुरनला पुढे पाठवले आणि कुरनने 6 चेंडूंत 18 धावा केल्या. त्यानं त्याची कामगिरी चोख बजाली. त्यानंतर तरी धोनी येईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यानं ऋतुराज गायकवाडला पाठवले. पण, समोर 216 धावांचे लक्ष्य असेल तेव्हा धोनीनं मैदानावर यायला हवं होतं. पण, पाचव्या विकेट्सनंतर धोनी आला. त्यानं ठरवलंच होतं की हा सामना आपण जिंकू शकत नाही. हा दृष्टीकोन योग्य नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा.'' ( Live Score & Updates )
गौतम गंभीरची टीका
तो म्हणाला, हेच जर कुणी दुसऱ्या कर्णधारानं केलं असतं, तर त्याच्यावर प्रचंड टीका झाली असती. पण, हा महेंद्रसिंग धोनी आहे आणि त्यामुळे लोकं यावर चर्चा करत नाहीत. तुमच्याकडे सुरेश रैना नाही, तरीही तू सॅम कुरनला पुढे करून त्याला स्वतःपेक्षा चांगला फलंदाज का भासवत आहेस. ऋतुराज गायकवाड, कुरन, केदार जाधव, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय यांना पुढे पाठवून ते तुझ्यापेक्षा चांगले फलंदाज आहेत, असे लोकांना मानण्यास भाग पाडतोस का?''
''महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला? गायकवाड, कुरन यांना त्यानं स्वतःच्या आधी पाठवलं. याला काहीच अर्थ नाही. खऱं तर अशा परिस्थितीत तू पुढे येऊन नेतृत्व करायला हवं होतं आणि याला नेतृत्व म्हणत नाही. त्यामुळे अखेरच्या षटकात त्याने मारलेले षटक हे संघाचा काहीच कामाचे नाही, ते वैयक्तिक धावा आहेत,''असेही गंभीर म्हणाला.
महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला?
सामन्यानंतर धोनीनं 7व्या क्रमांकावर येण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला,''मी बराच कालावधी फलंदाजी केलेली नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतही फार मदत मिळाली नाही. शिवाय ही लीगची सुरुवातच आहे आणि त्यामुळे काही नवीन गोष्टींची चाचपणी करायची होती. त्यामुळे सॅमला संधी दिली. आता प्रयोग करण्याची संधी आहे. जर ते यशस्वी झाले नाही, तर आपल्या जुन्हा स्ट्रॅटजीनं मैदानावर उतरू.'' (Live Score & Updates )
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं
संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video
महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six
महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी
Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल
Web Title: MS Dhoni had decided match is not going to be won: Sunil Gavaskar criticises CSK captain's approach against RR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.