बाबा मे तेरी मलिका...! अनंत-राधिकासाठी धोनीची पोस्ट; नवरदेवाला माहीने दिला खास सल्ला

Anant Ambani and Radhika Merchant Wedding : महेंद्रसिंग धोनीने राधिका आणि अनंत यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 05:05 PM2024-07-14T17:05:43+5:302024-07-14T17:06:13+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni has made a special post for Anant Ambani and Radhika Merchant | बाबा मे तेरी मलिका...! अनंत-राधिकासाठी धोनीची पोस्ट; नवरदेवाला माहीने दिला खास सल्ला

बाबा मे तेरी मलिका...! अनंत-राधिकासाठी धोनीची पोस्ट; नवरदेवाला माहीने दिला खास सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Anant Ambani and Radhika Merchant : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत अनंत आणि राधिका यांनी सातफेरे घेतले. भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडूही या लग्न सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. महेंद्रसिंग धोनीने या नवदाम्पत्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. 

धोनीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, राधिका, तुझे ते तेजस्वी हास्य याला कधीच अंत नको ते सतत असेच राहो. अनंत, प्लीज तू आजूबाजूच्या प्रत्येकाला दाखवतो त्याचप्रकारे प्रेम आणि दयाळूपणाने राधिकाची काळजी घे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरले जावो... अभिनंदन आणि लवकरच भेटू. हे गाणे विरेन काकांसाठी आहे. खरे तर धोनीने राधिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये 'बाबा मे तेरी मलिका', हे गाणे लावण्यात आले आहे. 

दरम्यान, देशातले बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबानींचा (Anant Ambani) विवाह सोहळा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड (GIO World) या ठिकाणी शनिवारी पार पडला. या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या तारे तारका (Bollywood Stars) विविध राजकीय नेते, उद्योजक या सगळ्यांची उपस्थिती होती. 

Web Title: MS Dhoni has made a special post for Anant Ambani and Radhika Merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.