नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकिर्दीत मोठे यश संपादन केले. माहीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विश्वचषकच जिंकला नाही तर टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषकही जिंकला आहे. कॅप्टन कूल थोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अनेक वर्षे अव्वल क्रमांकावर राहिला होता. मात्र अनेक विक्रमी सामन्यात विजय मिळवून देखील धोनीचे एक अधुरे स्वप्न राहिले आहे, जे खुद्द धोनीने जगासमोर शेअर केले आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. खरं तर धोनीने यावेळी आपल्या अधुऱ्या स्पप्नाचा उल्लेख केला आहे. एका शालेय विद्यार्थीनीने धोनीला त्याच्या आदर्शाबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना माहीने त्याच्या अधुऱ्या स्वप्नाची संपूर्ण कहाणी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
"माझा क्रिकेटमधील आदर्श म्हणजे सचिन तेंडुलकर"
धोनीने विद्यार्थीनीला उत्तर देताना म्हटले, "सचिन तेंडुलकर हा माझा क्रिकेटमधील आदर्श आहे. मी तुझ्या वयात असताना त्याला खेळताना पाहायचो. मला त्याच्यासारखे क्रिकेट खेळायचे होते, पण नंतर मला समजले की असे होऊ शकत नाही. पण मनापासून मला नेहमी त्याच्यासारखे खेळायचे होते." हेच कॅप्टन कूलचे अधुरे स्वप्न होते ज्याला धोनी पूर्ण करू शकला नाही.
याचदरम्यान आणखी एका विद्यार्थ्याने महेंद्रसिंग धोनीला प्रश्न विचारला. त्याने विचारले की शाळेच्या काळात तुमचा आवडता विषय कोणता होता? हा प्रश्न ऐकून माहीलाही थोडे हसू आले आणि मग "स्पोर्ट्स हे विषय म्हणून पात्र आहे का" असे त्याने उत्तर दिले. महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्व करणार करत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर धोनीने 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा घेतला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: MS Dhoni has said that his role model in cricket is Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.