MS Dhoni, IPL 2022: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएलच्या गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. क्रीडा जगतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक असलेल्या धोनीने मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे. धोनी क्रिकेटपासून दूर असताना त्याने लष्करात जाऊन देशसेवा केली. त्याशिवाय जेव्हा आयपीएल सुरू नसतं, त्यावेळी धोनीला त्याच्या आलिशान फार्महाऊसमध्ये त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह वेळ घालवणं आवडतं. होळीच्या मुहूर्तावर धोनी एक मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सूरतमध्ये IPL 2022 ची तयारी करतोय. परंतु तसं असलं तरी त्याने त्याच्या रांचीतील फार्महाऊसबाबत एक मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. इंडिया टुडेच्या, झारखंडच्या चंबो येथे धोनीने ४३ एकरचे बांधलेले फार्महाऊस होळीच्या काळात लोकांसाठी खुले असणार आहे. होळीच्या खास प्रसंगी शहरातील लोकांसाठी त्याचे रांची फार्महाऊस उघडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. अहवालानुसार, १७, १८ आणि १९ मार्च रोजी लोक फार्महाऊसला भेट देऊन भाज्या, फळे खरेदी करू शकतात.
दरम्यान, IPL बाबत बोलायचं झाल्यास धोनी स्पर्धेत संघाचं नेतृत्व करत असून सूरतच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. धोनीने २००८ पासून सुरू झालेल्या स्पर्धेत चार वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिलंय. सुरुवातीपासून CSK ला चार आयपीएल विजेतेपदं मिळवून दिली आहेत. यंदाच्या हंगामात सलामीचा सामना धोनीची चेन्नई आणि श्रेयस अय्यरचा कोलकाता संघ यांच्यातच होणार आहे.
Web Title: MS Dhoni has taken Big Decision on the Occasion of Holi Festival of Colors ahead of IPL 2022 Ranchi Farmhouse
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.