MS Dhoni DRS Accuracy Video: चेपॉकच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघालाच पराभवाचे पाणी पाजले. CSKचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 108 धावांच्या खेळीवर LSGच्या मार्कस स्टॉयनीसची नाबाद 124 धावांची खेळी भारी पडली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २११ धावा केल्या होत्या. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने ३ चेंडू आणि ६ गडी राखून पूर्ण केले. चेपॉक स्टेडियमवर CSKचा सामना असेल तर धोनीची चर्चा होणारच. धोनीला फलंदाजीत फारशी चमक दाखवायची संधी मिळाली नाही, पण त्याने क्षेत्ररक्षणाच्या वेळी केलेली एक कृती चर्चेत राहिली.
तुषार देशपांडेने टाकलेला 13व्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांनी वाइड म्हणून घोषित केला होता, पण धोनीला तो निर्णय पटलेला नव्हता. शतकवीर मार्कस स्टॉयनीस त्यावेळी क्रीजवर होता आणि तुषारची गोलंदाजी सुरु होती. अंपायरने चेंडू वाईड देताच धोनीने DRSचा इशारा केला, ऋतुराजनेही DRS घेतला. रिप्लेमध्ये स्टॉयनीस फलंदाजी करताना ऑफ स्टंपच्या बाहेर उभा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे अंपायरला निर्णय बदलावा लागला.
----
----
----
अपेक्षेप्रमाणे धोनीचा हा निर्णय योग्य ठरला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. स्पर्धेतील सर्वात वयस्क खेळाडूंपैकी एक असलेल्या धोनीची नजर अजूनही तीक्ष्ण आहे अशा आशयाची ट्विट्स चाहत्यांनी केली.