MS Dhoni has invested in these 7 businesses : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आणखी एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. धोनीने ड्रोन तयार करणाऱ्या Garuda Aerospace या कंपनीत गंतुवणूक केली आहे. Garuda Aerospace या कंपनीचे 26 शहरांमध्ये 300 ड्रोन्स व 500 पायलट्स आहेत. चेन्नईच्या या कंपनीत धोनीने गुंतवणूक केल्याची माहिती सोशल मीडियावर Garuda Aerospaceनेच दिली.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटव्यतिरिक्त अनेक कंपनींमध्ये गुंतवणूक केल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातही धोनीने एन्ट्री घेतली आहे. याशिवाय सेकेंड हँड कार विकणाऱ्या कार्स 24 पासून इंटीरियर डेकोरेशन कंपनी होमलेनमध्येही त्याची गुंतवणूक आहे. धोनीने मागच्या वर्षी Homelane या कंपनीत गुंतवणूक केली होती. होमलेन ही कंपनी इंटीरियर डेकोरेशनचे उत्पादन तयार करते. त्यांनी धोनीसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. धोनी या कंपनीचा केवळ सदिच्छादूत नाही, तर तो इक्विटी पार्टनरपण आहे. ही कंपनी 2014मध्ये सुरू झाली आणि दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकातासह 16 शहरांमध्ये त्यांचा बिझनेस आहे.
- Khatabook या कंपनीचाही धोनी सदिच्छादूत आहे आणि यातही धोनीची भागीदारी आहे.
- कार्स 24मध्येही धोनीने गुंतवणूक केल्याची चर्चा आहे.
- फूड अँड बेव्हरेज कंपनी 7 इंकब्रूजमध्येही धोनी शेअरहोल्डर आहे. कंपनीने मागच्या वर्षी कॉप्टर 7 नावानं चॉकलेट आणि बेव्हरेजची सीरिज लाँच केली होती.
- माही रेजिडेन्सी नावानं झारखंड येथील रांची येथे धोनीचं हॉटेल आहे.
- Seven फॅशन ब्रँड, स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड यातही धोनीची गुंतवणूक आहे.