IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सला आज अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून आयपीएल २०२२मधील क्वालिफायर १ मधील स्थान पक्के करायचे आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचे लक्ष्य स्पर्धेचा शेवट गोड करण्यावर आहे. RRच्या खात्यात १६ गुण आहेत आणि त्यांचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चितच आहे. CSKचे स्पर्धेतील आव्हान केव्हाच संपुष्टात आले असल्याने त्यांना आज हरले तरी काही फरक पडणार नाही. आजच्या लढतीपूर्वी CSKच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
आयपीएल २०२२मध्ये चेन्नईला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली. पण, ८ सामन्यांत दोन विजय मिळवल्यानंतर CSK च्या संघ व्यवस्थापनाने पुन्हा धोनीवर विश्वास टाकला. धोनीला या निर्णयाबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने जडेजाला हा भार पेलवत नसल्याचे आणि त्याचा खेळावर परिणाम होत असल्याचे सांगितले. पण, ४१ वर्षीय धोनी पुढील आयपीएलमध्ये ( IPL 2023) CSK चा कर्णधार असेल का?; हा प्रश्न सर्वांना सतावतोय. ESPNcricinfoने दिलेल्या वृत्तानुसार धोनी पुढील वर्षी CSKच्या कर्णधारपदी दिसणार आहे.
धोनीने CSKच्या व्यवस्थापनाला आयपीएल २०२३साठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे. त्यामुळे CSKच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२मधून माघार घेतलीय, परंतु कर्णधारपदावरून हटवल्याने तो नाराज असल्याची चर्चा आहे. अशात जडेजा CSKची साथ सोडणार का, हाही प्रश्न पडला आहे. पण, जडेजा हा CSK चा भाग आहे आणि तो पुढेही राहील हे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे. पुढील वर्षी धोनी ४२ वर्षांचा होईल आणि आयपीएल २०२३मधील तो वयस्कर खेळाडू असेल. मात्र, वयाचा त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर फरक पडलेला नसल्याचे यंदा पाहायला मिळाले आहे.
Web Title: MS Dhoni is set to continue as CSK captain next season, while Ravindra Jadeja will remain with the team as a player
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.