MS Dhoni jersey: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची क्रेझ किती आहे, हे सर्वांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पाहिलीच आहे. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा धोनी आजही चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे. त्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आणि त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाचवे आयपीएल जेतेपद उंचावले. आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनी बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतो आणि त्याने मिळवलेलं यश हे त्याची प्रचिती आहे. MS Dhoniला ७ क्रमांक खूप आवडतो आणि त्याची जर्सीही ७ नंबरची आहे. पण, या मागे अंधश्रद्धा आहे का?
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा देशासाठी खेळायचा तेव्हा तो ७ नंबरची जर्सी घालून मैदानात आणि तो CSK कडूनही याच क्रमांकाची जर्सी घालतो. महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. म्हणजे ७ तारीख आणि सातवा महिना, त्यामुळेच धोनी ७ नंबरची जर्सी घालतो. ही जर्सी धोनीसाठी लकी ठरली आहे. या क्रमांकाची जर्सी परिधान करून त्याने २००७ मध्ये भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला होता, २०११ मध्ये माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळवले होते. २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, सात हा एक असा आकडा आहे की, तो तुमच्या बाजूने किंवा विरोधातही जात नाही. पण, जर्सी नंबर निवडण्याआधी मला या अशा कोणत्याही गोष्टीची माहिती घेणे योग्य वाटले नाही.