मैत्रीसाठी काय पण! MS Dhoni ने कोट्यवधीच्या डिलवर पाणी सोडले; पुन्हा मनं जिंकली 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुन्हा एकचा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:23 PM2024-02-14T12:23:46+5:302024-02-14T12:25:41+5:30

whatsapp join usJoin us
'MS Dhoni let go of crores of rupees': MSD's latest bat sticker is making quite the headlines ahead of IPL 2024 | मैत्रीसाठी काय पण! MS Dhoni ने कोट्यवधीच्या डिलवर पाणी सोडले; पुन्हा मनं जिंकली 

मैत्रीसाठी काय पण! MS Dhoni ने कोट्यवधीच्या डिलवर पाणी सोडले; पुन्हा मनं जिंकली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुन्हा एकचा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीला कॅप्टन कूलने सुरुवात केली आणि नेटमध्ये तो फलंदाजी करताना दिसला. त्याच्या बॅटवरील स्टीकर्सने यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बॅटवर 'Prime Sports' चा स्टाकर्स लावून फलंदाजी करताना दिसला. धोनीने असं करून पुन्हा एकदा त्याच्या या यशस्वी प्रवासात मदत करणाऱ्यांप्रती आपलं प्रेम, आदर्श आणि आभार व्यक्त केले. 'Prime Sports' चे मालक परमजीत सिंग यांनी धोनीच्या या कृतीचं कौतुक केलं आणि त्याला नंबर १ मित्र असे म्हटले. 


यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने 'Beat All Sports' अर्थात BAS चा लोगो लावून २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये फलंदाजी केली होती. या कंपनीने धोनीला कारकीर्दिच्या सुरुवातीला प्रायोजकत्व दिलं होतं आणि त्यांचे आभार मानण्यासाठी धोनीने बॅटवर BAS स्टीकर लावले होते. धोनीने यासाठी एकही रुपया घेतला नसल्याचे कंपनीचे मालक सोमी कोहली यांनी सांगितले. टीम इंडियाच्या जर्सीतील धोनीचा तो शेवटचा वर्ल्ड कप असल्याने त्याने या संपूर्ण प्रवासात त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याप्रती प्रेम व आदर व्यक्त केला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जेव्हा धोनीने BAS चा स्टीकर लावून खेळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोहली यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण, मैत्री जपण्यासाठी धोनीने कोट्यवधींच्या डिलवर पाणी सोडल्याचे कोहली यांनी सांगितले.


''धोनीने यासाठी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. त्याने त्याच्या बॅटवर स्टीकर लावले आणि संपूर्ण स्पर्धेत खेळला. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, कारण बॅटवर स्टीकरसाठी त्याला कोट्यवधीचं डिल मिळत होतं. पण, त्याने ते कोट्यवधी रुपये नाकारले आणि माझ्या कंपनीचा स्टीकर लावला. त्याला समजावण्याची विनंती मी साक्षी, त्याचे वडिल व आई यांनाही केली. मी त्याचे CA व परमजीत यांनाही त्याला समजवा असे म्हटले. वर्ल्ड कपपूर्वी हे सर्व त्याच्या घरी गेले होते. पण, त्याने स्पष्ट नकार दिला, म्हणाला हा माझा निर्णय आहे,''असे कोहली यांनी सांगितले.  


१९९८ मध्ये धोनी आणि BAS यांच्यात नाते जमले. २५ वर्षापूर्वी युवा खेळाडू प्रायोजकाच्या शोधात होता आणि कोहली यांनी त्याच्यावर विश्वास दाखवून क्रिकेट किट पाठवले. २००४ पर्यंत BAS हेच धोनीचे प्रायोजक होते आणि त्याचवर्षी त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले. BAS चं स्टीकर लावून धोनीने पाकिस्तानविरुद्ध वन डे त १४८ धावा केल्या होत्या.  

Web Title: 'MS Dhoni let go of crores of rupees': MSD's latest bat sticker is making quite the headlines ahead of IPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.