भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर फार कमीच सक्रीय असतो. सोशल मीडियावर त्यानं कधी स्वतःचा व्हिडीओ पोस्ट केलाय, असं आठवतही नसेल. पण, चेन्नई सुपर किंग्सनं धोनीला सोशल मीडियावर आणले आहे. CSKनं धोनीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यात धोनीचा लूक पाहून त्याचे चाहते नक्कीच खुश झाले असतील. धोनीचा हा लूक पाहून तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आतषबाजी करण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहेत.
14 फेब्रुवारीला धोनीनं सोशल मीडियावर अखेरची पोस्ट केली आहे. कोरोना व्हायरसमुळे धोनी त्याच्या कुटुंबीयांसह रांची येथील फार्म हाऊसवर आहे. तेथे तो सेंद्रिय शेतीच्या कामाला लागला आहे. काही दिवसांपूर्वी धोनीच्या लूकनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. वाढलेले केस, पिकलेली दाढी अन् जाडजूड झालेला धोनी पाहून चाहत्यांनी माहीचं क्रिकेट संपलं अशी चर्चा सुरू केली होती. पण, हा व्हिडीओ त्या सगळ्यांना उत्तर आहे. धोनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी त्याची पत्नी इंस्टाग्रामवर त्याचे व मुलगी जिवा यांचे फोटो/ व्हिडीओ अपलोड करत असते. पाहा व्हिडीओ...
रांची येथे धोनीचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्यानं मागील महिन्यात 8 लाख किमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला. ट्रॅक्टरवर बसून शेत नांगरतानाचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता धोनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. धोनीनं महिंद्रा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदी केला. दिवाकर यांनी पुढे सांगितले की,''आमच्याकडे तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांची टीम आहे आणि नैसर्गिक खत कसं तयार करता येईल, यावर त्यांचं लक्ष आहे. पुढील दोन-तीन महिन्यात त्याचं लाँचिंग केलं जाईल. कालच रात्री मी त्याच्याशी बोललो.''
यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!
तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!
बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण