भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे बाबा पान सिंग आणि आई देविका देवी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांनाही रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (MS Dhoni mother and father test positive for Covid19 admitted to private hospital in Ranchi)
रांचीतील प्लस सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दोघं उपचार घेत आहेत. धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेतृत्व करत असून तो बायो बबलमध्ये आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर धोनीचा आज कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध सामना होणार आहे.
यूएईमध्ये गेल्या वर्षीची आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर धोनी कुटुंबियांसोबतच होता. अगदी यंदाच्या आयपीएल सीझनला सुरुवात होईपर्यंत तो कोणत्याही क्रिकेट स्पर्धेपासून दूरच होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतीत करत आहे. गेल्या आयपीएलपासून चार महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या सराव शिबिरात सामील झाला होता. त्यानंतर आयपीएल स्पर्धेच्या बायो बबलच्या नियमांचं धोनी पालन करत आहे. त्यामुळे कुटुंबियांशी तो संपर्कात आलेला नाही.
Read in English
Web Title: MS Dhoni mother and father test positive for Covid19 admitted to private hospital in Ranchi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.