MS Dhoni Captaincy, IPL 2022: यंदाचा हंगाम अवघ्या दोन दिवसात सुरू होणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीनंतर आता Ravindra Jadeja या संघाचं नेतृत्व करणार आहे. धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी आणखी दोन हंगामात तो संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार असल्याचं सागितलं जात आहे. २०१२ पासून रविंद्र जा़डेजा हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. धोनीच्या या निर्णयाने चाहते थोडेसे भावूक झाले असून एका युगाचा अंत (End of an Era) झाल्याची भावना सोशल मीडियावर दिसून आल्या.
--
--
--
--
--
--
--
महेंद्रसिंग धोनीला गेल्या दोन वर्षांपासून चाहते आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे सवाल करत होते. धोनी आणखी किती सीझन खेळणार असा सवाल अनेकदा करण्यात आला होता. पण त्याने या साऱ्या शक्यतांना वेळोवेळी पूर्णविराम दिला होता. २०२० च्या हंगामात धोनीच्या संघाने खूपच वाईट कामगिरी केली होती. त्यावेळी तो निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. पण तसं झालं नाही. याउलट पुढील हंगामात (IPL 2021) धोनीने संघाला विजेतेपद मिळवून दिलं.
पण, आता मात्र त्याने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी चेन्नईच्या संघाचं यापुढेही तो प्रतिनिधित्व करणारच आहे. आता नव्या हंगामात जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघ कसा खेळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.