Join us  

Video: हार्दिकला आउट करण्यासाठी धोनीचा मास्टरप्लॅन; डोळ्यासमोर फिल्डर बदलूनही फसला!

गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर गुरु आणि शिष्य यांच्यात सामना अशी चर्चा रंगली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:24 PM

Open in App

यंदाच्या आयपीएलमध्ये थेट अंतिम फेरी गाठताना चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या क्वालिफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ७ बाद १७२ धावा केल्यानंतर चेन्नईने गुजरातला २० षटकांत १५७ धावांवर गुंडाळले. 

गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर गुरु आणि शिष्य यांच्यात सामना अशी चर्चा रंगली होती. अलीकडच्या काळात हार्दिकच्या कर्णधारपदाची बरीच चर्चा होती. अशा परिस्थितीत तमाम क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे लक्ष वेधून घेत होते. या सामन्यात 'गुरु आणि शिष्य' यांच्यात सामना झाला आणि गुरू जिंकला, एवढेच नाही तर धोनीने हार्दिक पांड्याला आपल्या रणनीतीत अडकवले आणि हार्दिक पांड्याला बाद केले. ज्या चेंडूवर हार्दिक बाद झाला त्याआधी धोनीने खास चाल खेळली होती. यावेळीचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध पहिल्यांदाच विजयही मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अपेक्षित खेळी केली खरी, मात्र त्याच्या फलंदाजीत फारशी आक्रमकता दिसली नाही. परंतु, त्याचा अपवाद वगळता इतर प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. गुजरातचा अर्धा संघ ८८ धावांवर बाद करत चेन्नईने सामन्यावर पकड मिळवली. राशिद खानने पुन्हा एकदा शानदार फटकेबाजी करत गुजरातच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्याला देखील अपयश आले.

लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज

फलंदाजांना सूर गवसल्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करणाऱ्या मुंबई इंडियन्सला बुधवारी आयपीएल एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असेल, मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला धूळ चारण्यास रोहित शर्माचा संघ सज्ज झालेला दिसतो. मुंबईच्या नजरा सहाव्या जेतेपदाकडे आहेत. तर मागच्या सत्रात एलिमिनेटरमध्ये आरसीबीकडून पराभूत झालेला लखनौ संघ यंदा पुढे वाटचाल करण्यास उत्सुक आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत काळजीवाहू कर्णधार कृणालने उपलब्ध पर्यायांचा योग्य वापर केला. आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघाविरुद्ध विजयी लय कायम राखण्याचे लखनौचे प्रयत्न राहणार आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्याचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App