MS Dhoni Movie LGM: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या चाहत्यांची जगात कमी नाही. माही केवळ फलंदाजीमुळेच नव्हे तर त्याच्या साधेपणामुळेही चर्चेचा केंद्रबिंदू असतो. त्याला नेहमीच चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. अलीकडेच धोनीने त्याचा 42वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही त्याने शेअर केला होता आणि तो व्हायरलही झाला होता. तशातच आता माहीचा आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर 'LetsGetMarried' झपाट्याने ट्रेंड होत आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते, तिथे धोनीने त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिलावहिला तमिळ चित्रपट 'LGM' (लेट्स गेट मॅरीड) चे गाणे आणि ट्रेलर लाँच केले.
महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आणि त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) यांनी एकत्रितपणे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या LGM या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ लॉन्च केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यादरम्यान त्याने चेन्नईसोबतच्या त्याच्या खास नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला की त्याने चेन्नईतच भारतीय कसोटी पदार्पण केले होते आणि त्याच्या सर्वाधिक कसोटी धावा चेन्नईतच झाल्या होत्या. त्यामुळे आता पहिला तमिळ चित्रपट चेन्नईत बनत आहे. ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे.
एमएस धोनी आणि साक्षीचा सुंदर फोटो चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या सुपर कपलवरील आमचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात त्यांनी Love Grows More (LGM) अशी शाब्दिक कोटीही केली आहे.
--
धोनी एंटरटेनमेंटच्या लेट्स गेट मॅरीड चित्रपटात हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून रमेश थमिलमणी दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील गाणी त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाची संकल्पना धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी हिची आहे.
Web Title: ms dhoni production first film lsg lets get married trailer released by wife sakshi dhoni harish kalyan ivana ramesh thamilmani
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.