MS Dhoni Production House: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता फिल्मी विश्वावर अधिराज्य गाजवण्याची तयारी केली आहे. त्याचा अद्याप हिरो बनण्याचा कोणताही विचार नसला तरी त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस काही महिन्यांपूर्वीच सुरू केले. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे. धोनीच्या निर्मिती उपक्रमात बनत असलेल्या पहिल्या चित्रपटाचे शीर्षक आज समोर आले. या चित्रपटात साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.
लेट्स गेट मॅरीड (Lets Get Married) नावाचा हा चित्रपट धोनी एन्टरटेन्मेंट कंपनीचा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे. धोनीच्या चित्रपटात हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी करणार आहेत. आज या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. याआधी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश थमिलमनी यांनी सांगितले होते की, या चित्रपटाची संकल्पना धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी हिची आहे.
--
--
धोनी एंटरटेनमेंटने ऑक्टोबर २०२२ मध्ये चित्रपट निर्मितीमध्ये उतरण्याची घोषणा केली होती. त्या मोठ्या घोषणेनंतर केवळ तीन महिन्यांतच चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली. धोनी फिल्मी दुनियेत येण्यासाठी सज्ज असल्याची बातमी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, धोनी साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयसोबत एक चित्रपट करणार आहे. एवढेच नाही तर धोनी या चित्रपटात कॅमिओ देखील करू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. याच दरम्यान धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टार विजयला फोन करून हा चित्रपट करण्यास सांगितले असल्याचे बोलले जात होते. पण सध्या तरी घोषणा झालेल्या चित्रपटात विजयचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
Web Title: MS Dhoni production first tamil film lets get married starrer harish kalyan ivana directed ramesh thamilmani
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.