Join us  

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:59 PM

Open in App

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 7600 झाला असून मृतांची संख्या 249 पर्यंत गेली आहे. आतापर्यंत 774 रुग्ण बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. शिवाय प्रशिक्षणही बंद आहेत, परंतु महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन यांच्या अकादमीतर्फे लॉकडाऊनच्या काळातही मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

आर अश्विन आणि धोनी यांच्या अकादमीनं खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरून लाईव्ह क्लास भरवला जात आहे. धोनी स्वतः प्रशिक्षण देत नसला तरी त्याच्या अकादमीतील प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. अश्विन मात्र स्वतः प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत आहे.  त्यांच्या या ऑनलाईन ट्रेनिंगला चांगला प्रतिसादही मिळत आहे.  धोनीच्या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सत्रजीत लाहिरी यांनी सांगितले की एका सेशनच्या व्हिडीओला 10000 पर्यंत व्ह्यू मिळत आहेत.    दरम्यान, आयपीएल रद्द झाल्यास महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमात अडथळा निर्माण होऊ शकतो. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!

मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहेंद्रसिंग धोनीआर अश्विन