मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. चेन्नईच्या विजयानंतर धोनी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून सर्वत्र धोनीच्या चेन्नईचा बोलबाला सुरू आहे. परंतु आयपीएलवेळी जखमी झालेल्या महेंद्र सिंग धोनीची गुरुवारी सर्जरी करण्यात आली आहे. धोनीच्या गुडघ्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात ऑपरेशन झाले. लक्षणीय बाब म्हणजे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी धोनी भगवद्गीता वाचताना स्पॉट झाला.
दरम्यान, आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात धोनीला दुखापत झाली होती. गुजरातविरूद्ध सामना खेळताना धोनी जखमी झाला. या सामन्याच्या १९व्या षटकांत दीपक चाहरने टाकलेला चेंडू अडवण्यासाठी धोनीने डाइव्ह टाकली. त्यानंतर धोनीला ही दुखापत झाली. धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर कसेतरी तो उभा राहिला. काहीवेळ आराम केल्यानंतर तो पुन्हा विकेट किपिंगसाठी आला.
भगवद्गीता वाचताना धोनी स्पॉट
धोनीच्या चेन्नईचा 'पाचवा' पराक्रमगुजरात टायटन्सला फायनलच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.