MS Dhoni Retained By CSK As Uncapped Player Ahead Of IPL 2025 Mega Auction चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने माजी कॅप्टन महेंद्रसिंहला आगामी आयपीएल हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी खेळाडूंना रिटेन करण्यासासंदर्भात काही खास नियम करण्यात आले होते. त्यात गायब झालेला अनकॅप्ड प्लेयरचा नियम पुन्हा लागू करण्यात आला होता. हा नियम पुन्हा लागू झाल्यावर महेंद्रसिंह धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दिसणार अशी चर्चा रंगली होती. ही चर्चा खरी ठरली आहे.
ती चर्चा खरी ठरली, अन् चाहत्यांच्या मनासारख घडलं
चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात ४ कोटी एवढ्या रक्कमेसह धोनीला आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. धोनीची किंमत भलेही कमी झाले असेल पण मैदानात उतरण्याची त्याची हिंमत अजूनही ढळली नाही, हाच सीन पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत धोनीला या नव्या डीलमुळे तब्बल ८ कोटींचा घाटा झाला आहे. पण फ्रँचायझीसाठी कमी मोबदल्यात संघासोबत राहण्याचा घेतलेला हा निर्णय धोनीचे CSK संघासोबत असणारे स्ट्राँग बॉन्डिंगची झलक दाखवून देणारा आहे.
याआधी १२ कोटी रुपयांत दुसऱ्या क्रमांकाच्या रुपात करण्यात आलं होतं रिटेन
२०२२ मध्ये महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्स संघानं दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीसह १२ कोटी रुपयांसह रिटेन केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. धोनीकडून रवींद्र जडेजाकडे दिलेल्या कॅप्टन्सीचा निर्णय फसल्यावर ऋतुराज गायकवाड चेन्नई संघाचा नवा कॅप्टन झाला. नेतृत्व बदलानंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा रंगू लागली होती. चेन्नईच्या चाहत्यांना मात्र तो पुन्हा मैदानात उतरावा, असेच वाटत होते. आता तो पुढचा हंगाम खेळणार हे स्पष्ट झाले आहे.