Join us  

Video: निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात वेळ घालवणार; MS धोनीने सांगितले रिटायरमेंट प्लॅन...

MS Dhoni Retirement Plan: धोनीने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या रिटायरमेंट प्लॅनची माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 7:08 PM

Open in App

MS Dhoni On IPL Retirement: दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नेहमी चर्चेत असतो. आता धोनी त्याचा रिटायरमेंट प्लॅन सांगून चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात बोलताना माहीने आयपीएलमधून निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात काम करणार असल्याचे सांगितले आहे. 

या कार्यक्रमात एका चाहत्याने धोनीला निवृत्तीनंतर काय करणार, असे विचारले. यावर धोनी म्हणाला की, 'मी अद्याप याबाबत फारसा विचार केलेला नाही. मी सध्या क्रिकेट खेळतोय. क्रिकेटनंतर काय करायचं, हे माझ्यासाठीही महत्वाचं आहे. पण एक गोष्ट निश्चित, निवृत्तीनंतर मला भारतीय सैन्यासोबत आणखी काही वेळ घालवायचा आहे. गेल्या काही वर्षांत मी हे करू शकलो नाही,' असं धोनी म्हणाला.

तुमच्या माहितीसाठी, एमएस धोनीला 2011 साली भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान केली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे. यापूर्वी तो अनेकदा आर्मी ड्रेसमध्ये दिसला आहे.

IPLमध्ये धोनी कायम 42 वर्खीय धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय. तो सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून गेल्या मोसमात त्याने पुन्हा एकदा आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. गेल्या आयपीएल मोसमात धोनीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई फ्रँचायझीचे पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डसोशल मीडियाभारतीय जवान