Join us  

MS Dhoni Retirement: "तो धोनीचा शेवटचा सामना होता हे रिषभ पंतला आधीच माहिती होतं..."; टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा खुलासा

धोनीने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेला सामना शेवटचा आंतरराष्ट्रीय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 1:33 PM

Open in App

MS Dhoni Retirement shocking revelation: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दोन वेळा विश्वचषक विजेता महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या निर्णयांनी आश्चर्यचकित करत असतो. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा त्याने असेच काहीसे चकित केले. धोनीच्या या निर्णयाने चाहते आणि क्रीडा जगतातील दिग्गजांना धक्का बसला. मात्र याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना धोनीच्या निवृत्तीची आधीच माहिती होती असा खुलासा खुद्द श्रीधर यांनी केला आहे.

२०१९ विश्वचषकाची उपांत्य फेरी हा शेवटचा सामना

कर्णधार म्हणून सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा पहिला खेळाडू होता. त्याने २००७ मध्ये T20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकला. दोन वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही त्याच्या नावावर होते. धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, धोनीने या सामन्या दरम्यान निवृत्ती घेण्याचे मन बनवले होते. त्यानंतर धोनीने रिषभ पंत आणि श्रीधर यांना निवृत्तीचे संकेत दिले होते.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांचा मोठा खुलासा

श्रीधर यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड- माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम' या पुस्तकात हा खुलासा केला आहे. त्याने लिहिले, 'मी आता खुलासा करू शकतो की धोनीने शेवटचा सामना खेळल्याचे मला कळले होते. जरी त्याने ते उघड केले नसले तरी मला माहिती होते. मला हे कसे कळले ते मी सांगतो. विश्वचषक २०१९ मधील न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या राखीव दिवशी सकाळी नाश्त्यासाठी मँचेस्टरला पोहोचणारा मी एकमेव व्यक्ती होतो. मी कॉफी पीत होतो, त्यानंतर एमएस धोनी आणि रिषभ पंत आत आले. त्यांनी आपले सामान उचलले आणि माझ्याबरोबर टेबलावर बसले. त्यानंतर रिषभ पंत धोनीला हिंदीत म्हणाला 'भाई, काही मुले एकटे लंडनला जाण्याचा विचार करत आहेत. तू उत्सुक आहेस?' तेव्हा धोनी म्हणाला, 'नाही, रिषभ, मला माझ्या टीमसोबतचा माझा शेवटचा बस प्रवास चुकवायचा नाही. मी या संभाषणाबाबत कोणाशीही बोललो नव्हतो. कारण मी धोनीचा आदर लक्षात घेऊन कोणाला काही सांगितले नाही. मी रवी शास्त्री किंवा अरुण, अगदी माझ्या पत्नीलाही काहीही सांगितले नाही," असे ते म्हणाले. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघरिषभ पंत
Open in App