वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी टेनिस कोर्टवर उतरला आणि त्यानं तेथे विजयी पदार्पण केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या कंट्री क्रिकेट क्लब टेनिस स्पर्धेत धोनी खेळला आणि तेथे विजयही मिळवला. पण, धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानं झारखंड स्टेडियमवर क्रिकेटचा कसून सरावही केला.
पण, रिषभ पंत वगळता निवड समितीनं अन्य यष्टिरक्षकाला संधी दिलेली नाही. त्यात पंतही अपयशी ठरत आहे. त्यामुले धोनीला पुन्हा बोलावण्याची मागणी जोर धरत आहे. धोनीनं झारखंड क्रिकेट असोसिएसन स्टेडिमवर कसून सराव करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमबॅकचे संकेत दिले.