Join us  

MS Dhoni reveals mystery behind jersey number 7 : महेंद्रसिंग धोनीनं सांगितलं 'जर्सी क्रमांक ७' मागचं गुपित; तुम्हालाही भावेल 'कॅप्टन कूल' साधं, सिम्पल लॉजिक!

MS Dhoni reveals the mystery behind jersey number 7 : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 4:02 PM

Open in App

MS Dhoni reveals the mystery behind jersey number 7 : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. IPL 2022 च्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार असल्यामुळे MS Dhoniने CSKचे सराव शिबिर सुरत येथे खेळवण्याचा निर्णय घेतला.  सुरतमधील स्टेडियमसाठी मुंबईतील माती वापरण्यात आल्याने धोनीनं हा निर्णय घेतला आणि त्याचे संघमालक एन श्रीनिवासन यांनी बुधवारी कौतुक केले. India Cementsचा एक कार्यक्रम बुधवारी चेन्नईत पार पडला आणि यात धोनीने व्हिडीओ कॉल द्वारे उपस्थिती लावली होती. यावेळी त्याला जर्सी क्रमांक ७ बद्दल विचारण्यात आले आणि त्यानं हा क्रमांक निवडण्यामागचे खरे कारण अखेर जाहीर केले.

Numbar 7 जर्सी दिसली की डोळ्यासमोर चटकन उभा राहतो तो दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो. पण, भारतात ही जर्सी फेमस केली ती वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने .... धोनीने नंबर ७ जर्सीचा एक ब्रँडच भारतात तयार केला. २००७ मध्ये सात क्रमांकाची जर्सी घालून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात धोनीनं ७ क्रमांकाची जर्सी मागचं गुपित सांगितलं.  

नंबर ७ हा माझ्या हृदयाच्या जवळ असल्याचे धोनी यावेळी म्हणाला. त्याने सांगितले की, नंबर ७ हा माझ्यासाठी लकी नंबर असल्याचा अंदाज अनेकांनी सुरुवातीला लावला. या क्रमांकाबाबत अनेक चर्चा रंगल्या, परंतु हा क्रमांक निवडण्यामागे एक साधं सोप कारण आहे. माझा जन्म ७ जुलैचा... सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी मी जन्मलो आणि हेच जर्सी क्रमांक निवडण्यामागचं खरं कारण आहे.''

''कोणता क्रमांक चांगला आहे, कोणता नाही, या भानगडीत पडण्यापेक्षा मी माझी जन्म तारीखच निवडली. पण, मला लोकं जेव्हा याबाबत वारंवार विचारायची तेव्हा मी त्यांना वेगवेगळी उत्तरं द्यायचो.. मी सांगायचो ८ मधून १ वजा केल्यास ७ होतात, ७ हा तटस्थ क्रमांक आहेत. लोक खरं तर मला जे सांगत राहिले, मी ते आत्मसात करू लागलो आणि मी त्याच पद्धतीने इतरांना सांगू लागलो.  बर्‍याच लोकांनी सांगितले की ७ ही एक तटस्थ संख्या आहे आणि जरी ती तुमच्यासाठी काम करत नसली, तरी ती तुमच्या विरुद्ध जात नाही. मी माझ्या उत्तरात ते देखील जोडले. मी याबद्दल फारसा अंधश्रद्धाळू नाही, परंतू हा एक नंबर आहे जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि मी तो वर्षानुवर्षे माझ्याकडे ठेवला आहे," असे तो पुढे म्हणाला.

पाहा व्हिडीओ... 

 महेंद्रसिंग धोनीने घेतलाय सर्वाधिक पगारव्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात १५० कोटींचा पल्ला ओलांडणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. धोनीनं पहिल्या तीन पर्वात १८ कोटी पगार घेतला. त्यानंतर पुढील तीन पर्वांत त्याचा पगार हा ८.२८ कोटी झाला. २०१४ व २०१५ मध्ये त्यानं १२.५ कोटी प्रती पर्व घेतले. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना त्यानं त्या दोन पर्वात २५ कोटी पगार घेतला. २०१८च्या लिलावात CSKनं त्याला १५ कोटींत संघात कायम राखले. त्यानंतर त्यानं पुढील चार पर्वात CSKकडून ६० कोटी इतका पगार घेतला. आयपीएल २०२२ मध्ये त्याला १२ कोटींत कायम राखले गेले. 

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १५ ऑगस्ट २०२०ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात  ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३  धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.

 IPL मधील कामगिरी२२० सामन्यांत ४७४६ धावा, २३ अर्धशतकं, ३२५ चौकार व २१९ षटकार आणि १२६ झेल व ३९ स्टम्पिंग

चेन्नई सुपर किंग्जचा संघ  महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी),  केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर  ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्स
Open in App