आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) संघाने आणखी एक सामना गमावला. आपल्या सात सामन्यांतील पाचवा सामना ते हारले आणि आयपीएलच्या इतिहासातील आपली सर्वात खराब कामगिरी त्यांनी नोंदवली. याबद्दल त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (M S Dhoni) म्हटलेय की, चेन्नई सुपर किंग्जच्या जहाजाला खूपच भोके पडली आहेत. तत्काळ एकत्र येऊन दुरुस्तीची गरज आहे.
IPL 2020, MI vs DC: मुंबई-दिल्ली संघांदरम्यान चुरशीच्या लढतीची अपेक्षा; मुंबई इंडियन्सचे पारडे वरचढ
राॕयल चॕलेंजर्सकडून (Royal Challengers) 37 धावांनी हार पत्करल्यावर तो म्हणाला की आमच्या फलंदाजीचे अपयश ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. त्याबाबत निश्चितच काहीतरी करावे लागणार आहे. मला वाटते आता फलंदाजीचा पवित्रा बदलावा लागणार आहे. भलेही बाद झाले तरी चालेल पण फटके मारण्याचा धोका पत्करावा लागणार आहे. 15 व्या किंवा 16 व्या षटकानंतर आटापिटा करावा लागू नये यासाठी हे आवश्यक आहे. आमच्या फलंदाजीचा 6 षटकानंतर जो दम हरवलेला दिसतोय तो दम आणण्याची गरज आहे.
राॕयल चॕलेंजर्सविरुध्द 170 धावांचे लक्ष्य असताना ते 8 बाद 132 धावाच करु शकले. यादरम्यान कधीही ते आवश्यक धावगतीच्या जवळपास दिसले नाहीत. 15 षटकानंतर राॕयल चॕलेंजर्सने 4 बाद,95 वरुन 4 बाद 169 पर्यंत मजल मारली. याच टप्प्यावर सीएसाकेची स्थिती 3 बाद, 96 अशी होती तरीसुध्दा ते 8 बाद 132 एवढीच मजल मारु शकले. हा फरक दोन्ही संघांतील फरक स्पष्ट करणारा आहे.
CSK vs RCB Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा अपयशाचा पाढा कायम; RCBची विजयासह चौथ्या स्थानी झेप
गेल्या सामन्यात त्यांचा केदार जाधव हा संथ फलंदाजीसाठी टीकेचे लक्ष्य ठरला होता पण आता तर त्यांच्या पूर्ण संघानेच केदारसारखी फलंदाजी केल्याची टीका होतेय. केदारच्या जागी त्यांनी जगदीशनला संधी दिली पण तोसुध्दा फार बदल करु शकला नाही. त्याचा स्वतःचा स्ट्राईक रेट केदारपेक्षा थोडासाच बरा राहिला.
या स्थितीबद्दल धोनीने म्हटलेय की, जहाजाला खूप भोके पडली आहेत आणि तुम्ही एक बंद करायला जाता तेंव्हा दुसऱ्यातुन पाणी आत शिरतंय. याचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित कामगिरीची गरज आहे.
Web Title: MS Dhoni Says, CSK ship has many holes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.