कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे लीग लांबणीवर पडली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रांची येथील आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटात धोनीनं फार्म हाऊसवर सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक जाहीराती न करण्याचा निर्णय भारताचा माजी कर्णधार धोनीनं घेतला आहे. त्याऐवजी सेंद्रीय शेती करण्याचे त्यानं ठरवले आहे.
Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत
''देशभक्ती ही त्याच्या रक्तातच आहे. मग तो भारतीय सैन्यासाठी काम करत असताना असो किंवा शेती करतान प्रत्येक काम तो मेहनतीने करतो. धोनीच्या नावावर अंदाजे 40-50 एकर शेत जमीन आहे, त्यावर सेंद्रीय पद्धतीनं तो सध्या पपई, केळी यासारखी फळं पिकवण्याचा प्रयत्न करत आहे,''अशी माहिती धोनीचा बालपणीचा मित्र मिहीर दिवाकरने दिली. त्यानं पुढे सांगितले की,''त्यानं व्यावसायिक जाहीराती करणं थांबवलं आहे आणि कोरोना संकट संपून जीवनमान पुर्वपदावर येईपर्यंत कोणतीच व्यावसायिक जाहिरात करणार नसल्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.''
रांची येथे धोनीचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्यानं मागील महिन्यात 8 लाख किमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला. ट्रॅक्टरवर बसून शेत नांगरतानाचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता धोनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. धोनीनं महिंद्रा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदी केला. दिवाकर यांनी पुढे सांगितले की,''आमच्याकडे तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांची टीम आहे आणि नैसर्गिक खत कसं तयार करता येईल, यावर त्यांचं लक्ष आहे. पुढील दोन-तीन महिन्यात त्याचं लाँचिंग केलं जाईल. कालच रात्री मी त्याच्याशी बोललो.''