Join us  

भारतीय संघाबाहेर असलेल्या महेंद्रसिंग धोनीची 'या' संघाच्या कर्णधारपदी निवड  

भारतीय संघाच्या आगामी मालिकांसांठी धोनीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र असे असले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 12:27 PM

Open in App

नवी दिल्ली -  भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंग धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर एकही सामना खेळलेला नाही. तसेच भारतीय संघाच्या आगामी मालिकांसांठीसुद्धा धोनीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र असे असले तरी धोनीने गेल्या 10 वर्षात भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान राखत त्याची गेल्या दशकातील 11 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. तसेच या संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. 

भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने गेल्या दशकभरातील 11 सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्रसिंग धोनी आणि झहीर खान या पाच भारतीय क्रिकेटपटूंना उथप्पाने स्थान दिले आहे. यांच्याशिवाय ख्रिस गेल, स्टीव्हन स्मिथ, एबी डीव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डॅनियल व्हेटोरी, लसिथ मलिंगा यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. उथप्पाने निवडलेले दशकातील 11 सर्वोत्तम खेळाडू  रोहित शर्मा, ख्रिस गेल, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, एबी डीव्हिलियर्स, युवराज सिंह, महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, डॅनियल व्हेटोरी, झहीर खान, लासिथ मलिंगा.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ