झाडं लावा, जंगल वाचवा!, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सध्या कुटुंबीयांसोबत शिमला येथे भटकंतीला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:32 AM2021-06-26T10:32:47+5:302021-06-26T10:33:41+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni Shares Message to 'Plant Trees' But Twitter is Divided; Here's Why | झाडं लावा, जंगल वाचवा!, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण

झाडं लावा, जंगल वाचवा!, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सध्या कुटुंबीयांसोबत शिमला येथे भटकंतीला गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यात त्यानं 'झाडं लावा, जंगल वाचवा!' असा संदेश दिला आहे. पण, त्याचा हा संदेश त्याच्यावरच उलटला आहे आणि नेटिझन्स त्याला ट्रोल करू लागले आहेत. ( MS Dhoni Shares Message to 'Plant Trees' But Twitter is Divided) 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख ठरली, IPL 2021 संपताच दोन दिवसांत सुरू होणार 'रणसंग्राम'!

महेंद्रसिंग धोनीचा हा फोटो आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनं पोस्ट केला आहे. या फोटोत धोनी लाल रंगाचा टी-शर्ट घालून अन् नव्या लूकसह दिसत आहे. त्यावर CSKने लिहिलं की, धोनी योग्य विचारांची पेरणी करत आहे. 


पण, धोनीच्या या संदेशावरून नेटकरी विभागले आहेत. संपूर्णपणे लाकडानं तयार केलेल्या कॅफेत उभा राहून, लाकडाच्याच पाटीवर झाडं लावा व जंगल वाचवा असा संदेश देणाऱ्या धोनीला ट्रोल केलं जात आहे.  




Web Title: MS Dhoni Shares Message to 'Plant Trees' But Twitter is Divided; Here's Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.