Join us  

"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप

Harbhajan Singh angry on MS Dhoni, IPL 2024 CSK vs PBKS: पंजाब विरूद्ध चेन्नई सामन्यातील एक घटनेनंतर भज्जी संतापला, व्यक्त केला झालेल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:12 PM

Open in App

Harbhajan Singh angry on MS Dhoni, IPL 2024 CSK vs PBKS:  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानले जातात. या दोन्ही संघांच्या नावावर पाच विजेते पदे आहेत. यंदाच्या वर्षी या दोन्ही संघांमध्ये नेतृत्व बदल करण्यात आला. चेन्नईचे कर्णधार पद दोन्ही ऐवजी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कडे देण्यात आले तर मुंबईचे कर्णधार पद रोहित शर्मा (Rohit Sharma) कडून काढून घेत हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आले. दोन्ही संघांमध्ये कर्णधार बदलला असला तरी दोन संघांच्या कामगिरीत प्रचंड तफावत दिसून येत आहे. मुंबईचा कर्णधार बदल त्यांच्या पचनी न पडल्याचे दिसत असून ते स्पर्धेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पण चेन्नई सुपर किंग्सचा संघ मात्र 11 सामन्यात सहा विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीत प्रबळ दावेदारी सांगत आहे. असे असूनही माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने महेंद्रसिंग धोनीबाबत एक रोखठोक विधान केले आहे.

"महेंद्रसिंग धोनीला जर नवव्या क्रमांकावरच बॅटिंगला यायचं असेल तर त्यापेक्षा त्याने खेळूच नये. त्याच्या जागी संघात एखादा वेगवान गोलंदाज खेळवता येऊ शकतो. महेंद्रसिंग धोनी हा सीएसके च्या निर्णय प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे, पण गेल्या काही सामन्यांमध्ये लवकर फलंदाजीला न आल्याने त्याने आपल्याच संघासाठी काही समस्या निर्माण केल्या आहेत. पंजाबच्या सामन्यात धोनीच्या अगोदर शार्दूल ठाकूरला पाठवण्यात आल्याचा निर्णय योग्य नव्हता. शार्दुल ठाकूर दोन्हीप्रमाणे मोठे फटके खेळण्याची क्षमताच राखत नाही. त्यामुळे मला धोनीचे हे वागणे समजत नाही. सीएसके संघात धोनीच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच धोनीने उशिरात उशिरा बॅटिंगसाठी यावे हा निर्णय इतर कोणीतरी घेत असेल हे मला पटणारच नाही. मी हे मान्यच करणार नाही की धोनीच्या परवानगीशिवाय हे सगळं घडतंय," असे चेन्नई संघाकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला.

दरम्यान, पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी हर्षल पटेल च्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. हर्षल पटेलचा यॉर्कर चेंडू धोनीला खेळता आला नाही. सामन्यात रवींद्र जाडेजाने 26 चेंडू दमदार 43 धावा केल्यामुळे चेन्नईच्या संघाला 20 षटकांमध्ये नऊ बाद 167 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच गोलंदाजीतही जाडेजाने 20 धावा देऊन तीन बळी टिपले. त्याच्यामुळेच चेन्नईला कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये चांगला विजय मिळवता आला.

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीहरभजन सिंग