Join us  

MS Dhoni: ...म्हणून टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवली गेली टीम इंडियाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी, समोर आलं मोठं कारण 

MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला भारतीय संघामध्ये नव्या जबाबदारीसह बोलावण्यात आले असून, त्याची संघाच्या मेंटॉर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 1:14 PM

Open in App

मुंबई - पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघासोबत महेंद्र सिंग धोनीकडेही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला भारतीय संघामध्ये नव्या जबाबदारीसह बोलावण्यात आले असून, त्याची संघाच्या मेंटॉर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (So the responsibility of Mentor of Team India has been handed over to Mahendra Singh Dhoni for the T20 World Cup)

आयसीसी क्रिकेट स्पर्धांमधील धोनीच्या सरस कामगिरीमुळेच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता. धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने शेवटची आयसीसी ट्रॉपी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही.

टी-२० विश्वचषकामध्ये धोनीकडे मेंटॉरपदाची जबाबदारी सोपवण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयसीसीच्या स्पर्धेमध्ये विराट कोहलीला आलेलं अपयश हे आहे. आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत ३८ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जगातील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याला आतापर्यंत म्हणावी, तशी छाप पाडता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वात भारताला एकही आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावता आलेले नाही. यावर्षी जूनमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत विजय मिळवण्याची संधी विराट कोहलीकडे होती. मात्र या सामन्यातही भारतीय संघाने निराशा केली.हेही वाचा -  एमएस धोनीच्या निवडीचे आणि रजनीकांतचे कनेक्शन काय? ट्विट व्हायरल 

२०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तर २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघ पराभूत झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मोठ्या स्पर्धांमधील लढतींचा दबाव झेलू शकत नाही, असे दिसून येते. एवढेच नाही तर विराट कोहलीला आयपीएलमध्येही आपले नेतृत्व सिद्ध करत आलेले नाही.

एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून विराट कोहलीला आलेल्या अपयशामुळे धोनीला संघाचा मेंटॉर बनवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आता धोनीच्या मदतीने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला असेल. जर या स्पर्धेत अपयश आले, तर विराट कोहलीचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद धोक्यात येऊ शकते.   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१टी-20 क्रिकेटविराट कोहली
Open in App