जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजपासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून पहारा देणार आहे. भारतीय सैन्यानं ही माहिती दिली आहे. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. या विभागात धोनी 19 किलोचं वजन घेऊन पहारा देणार आहे.
धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे.
श्रीनगर येथील बादामी बाग कँट विभागात धोनी 8-10 सैनिकांसोबत पहारा देणार आहे. यावेळी त्याला एके-47 रायफल आणि 6 ग्रेनेड व बुलेटप्रुफ जॅकेट देणार आहे. धोनी गार्ड यूनिटमध्येही रक्षकाचे काम पाहणार आहे. तो 4-4 तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. ही ड्युटी दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये करावी लागणार आहे. दिवसपाळीत त्याला पहाटे चार वाजता उठावे लागणार आहे.
महेंद्रसिंग धोनीचं सर डॉन ब्रॅडमन यांच्या पावलावर पाऊलसैन्यसेवत दाखल होणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू नाही. भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कॉलोनेल कोट्टारी कनकिया नायुडू हेही सैन्यात होते. शिवाय लेफ्टनन कॉलोनेल हेमू अधिकारी यांचे कसोटी पदार्पण वर्ल्ड वॉर टू मुळे लांबणीवर पडले होते. त्यांनीही सैन्यसेवा केली आहे. त्यानंतर चंद्रशेखर गडकरी, नरैन स्वामी, रमन सुरेंद्रनाथ, अपूर्वा सेनगुप्ता आणि वेनाटप्पा यांनीही सैन्यसेवा केली आहे.
महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हेही लेफ्टनन होते. त्यांनी जून 1940साली ऑस्ट्रेलियन एअर फोर्स जॉईन केली होती. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन आर्मीत ट्रान्सफर घेतली आणि त्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले. पण, त्यांच्या प्रकृतीत वैद्यकीय दोष आढळल्यामुळे त्यांना जून 1941मध्ये सैन्यातून निवृत्त करण्यात आले. इंग्लंडच्या सर लेन हटन यांनीही सहा वर्ष सैन्य प्रशिक्षण घेतले. तेथे त्यांच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याचा क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम झाला.