MS Dhoni Superfast Run Out Video IPL 2022 CSK vs PBKS: पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा कर्णधार रविंद्र जाडेजा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी चेन्नईने संघात कोणताही बदल केला नाही. पंजाबने मात्र संघात दोन महत्त्वाचे बदल केले. राज बावा आणि हरप्रीत ब्रार या दोघांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्याजागी वैभव अरोरा आणि जितेश शर्मा या दोघा नवोदितांना संधी दिली. या सामन्यात धोनीने अतिशय चपळाईने फलंदाजाला धावचीत करत टीकाकारांची बोलती बंद केली.
महेंद्रसिंग धोनी हा वय झालेला खेळाडू आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त व्हावं, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर दिसतात. पण या साऱ्या टीकाकारांना आणि ट्रोलर्सना धोनीने आज गप्प केलं. सामना सुरू होताच पंजाबच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार मयंक अग्रवाल ४ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर पुढच्याच षटकात धोनीच्या चपळ क्षेत्ररक्षणाची झलक चाहत्यांना पुन्हा एकदा दिसून आली. भानुका राजपक्षे धाव घेत असताना काहीसा गोंधळ झाला. गोलंदाज ख्रिस जॉर्डनने चेंडू स्ट्राईकच्या दिशेकडील स्टंपवर मारला पण चेंडू बाजूने गेला. त्याच वेळी धोनीने अतिशय वेगवान गतीने धावत येत चेंडू पकडला आणि त्याच वेगाने स्टंपवर मारत राजपक्षेला चपळाईने रन आऊट केला. पाहा व्हिडीओ-
पंजाब किंग्ज संघ: मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा (डब्ल्यू), ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा
चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (क), एमएस धोनी (डब्ल्यू), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी