भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सज्ज झाला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली. ती होणार की नाही, यावरही शंका होती. पण, अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. असे असले तरी धोनी आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. त्याचा नवा लूक सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आयोजनाच्या दृष्टीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल यांच्यात आज बैठक होणार आहे. आयसीसीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द केल्यानंतर आयपीएलच्या 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे यंदाची आयपीएल खेळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआय व यूएई क्रिकेट यांच्यात चर्चाही झाली आहे. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8/10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार असल्याचे गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केलं होतं.
वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे. या काळात धोनी सेंद्रीय शेती करतानाचे वृत्त होते आणि तसे फोटो व व्हिडीओही व्हायरल झाले होते. याच काळात धोनीचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात धोनी सफेद दाढीत दिसत होता आणि त्याचं वजनही वाढल्याचं दिसत होते. पण, आता आयपीएल होणार हे निश्चित झाल्यानंतर धोनीचा नवा लूक समोर आला आहे.
दरम्यान, आयपीएलसाठी एक महिनाआधी आयपीएल संघ संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल होणार आहे. पण, धोनीचा
चेन्नई सुपर किंग्स संघ त्याआधीच यूएईत दाखल होणार असल्याचे वृत्त Gulf News ने प्रसिद्ध केलं आहे. Gulf Newsला सूत्रांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स यूएईत दाखल होणार आहे. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि कोरोना व्हायरसमुळे बराच कालावधी अॅक्शनपासून दूर राहिलेल्या खेळाडूंना पुन्हा तयारीसाठी लवकर यूएईत दाखल होणार आहोत.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत
कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा
हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!
Web Title: MS Dhoni surprises fans with his new look ahead of IPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.