नुकतेच धोनीला बाहुबली अवतारात पाहिले गेले आहे. आयपीएल प्रॅक्टिस सेशनवेळी पिवळ्या स्लिव्हलेस जर्सीमध्ये त्याचे दंड सारे काही सांगत होते. हाच धोनी एकेकाळी दहा दहा लीटर दुध पित होता. त्याची ताकद एवढी होती, की त्याने एका बॉलरची बोटे मोडली होती. दूरदूरवर बॅटने भिरकावलेला चेंडू, हे सारे आपण तो टीम इंडियात आल्यावर पाहिले. परंतू त्याच्या आधी एक मोठा किस्सा घडला होता. त्याचा साक्षीदार रॉबिन उत्थप्पा होता.
धोनीने भारतीय संघात येण्यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये मुनाफ पटेलपासून अनेकाना धुतले होते. पहिल्यादा मी धोनीला एनसीए बंगळूरुमध्ये पाहिले होते. भारतीय शिबिर होते, तिथे मुनाफ पटेल तेव्हा स्लिंग अॅक्शनने वेगवान गोलांदाजी करायचा. अन्य गोलांदाजही होते, धोनी त्यांना षटकार खेचत होता. स्पिनर एस श्रीरामची वेळ आली. तो धोनीला गोलंदाजी करत होता. धोनीने एक जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला. श्रीरामने हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. श्रीरामची दोन बोटे तुटली होती. आम्हाला वाटले श्रीराम बॉलच्या मागे धावतोय, परंतू त्याने थेट वेदनेने विव्हळत ड्रेसिंग रुम गाठला. तेव्हाच आम्हाला हा धोनी भारतासाठी खेळेल हे समजले होते, असे उत्थप्पा म्हणाला.
इतर खेळाडूंप्रमाणे धोनीला जिममध्ये घाम गाळणे आवडत नाही. तो इतर शारीरिक हालचालींसह स्वतःला तंदुरुस्त ठेवतो. बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस आदी खेळ खेळतो. 2005 मध्ये विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने 148 धावा चोपल्या होत्या. तेव्हा त्याने दुध हे हाय एनर्जीचे सिक्रेट असल्याचे सांगितले होते. रोज 10 लिटर दूध पित असल्याचे तो म्हणाला होता. आता हे प्रमाण कमी आले आहे, धोनी दिवसाला एक लीटर दूध पितो, असे समजते.