Join us  

IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!

सोशल मीडियावर यंदा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची सर्वाधिक चर्चा झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 1:35 PM

Open in App

आयपीएल २०२४ चा हंगाम नाना कारणांनी खास ठरला. या हंगामात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झाला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध २० षटकांत २८७ धावा कुटल्या. आयपीएल सुरू असली की सोशल मीडियावर एकच चर्चा रंगत असते. नेहमीप्रमाणेच यंदा देखील सोशल मीडियावर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची सर्वाधिक चर्चा रंगली. पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे सर्वात ट्रेडिंगवर राहणारे परदेशी खेळाडू ठरले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मागे टाकणाऱ्या आयपीएलची सोशल मीडियावर भलतीच क्रेझ असते. 

सोशल मीडियावर यंदा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची सर्वाधिक चर्चा झाली. पाचवेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ३७.६K वेळा मेन्शन करण्यात आले. तर राजस्थान रॉयल्सला ३६.३K वेळा मेन्शन केले गेले.

सर्वाधिकवेळा मेन्शन केलेले काही खेळाडू महेंद्रसिंग धोनी - ८६ हजार विराट कोहली - ७७.९ हजारश्रेयस अय्यर - ९.५ हजार 

सर्वाधिकवेळा मेन्शन केलेले संघ - मुंबई इंडियन्स - ३० हजारदिल्ली कॅपिटल्स - २५ हजारसनरायझर्स हैदराबाद - २२ हजाररॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २० हजारचेन्नई सुपर किंग्स - १९.७ हजार

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवून किताब जिंकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने स्फोटक खेळी केली. केकेआरचा संघ सर्वप्रथम २०१२ मध्ये आयपीएलचा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांना किताब जिंकण्यात यश आले. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एकदा आयपीएल जिंकली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीमुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्ससोशल मीडिया