Sachin Tendulkar MS Dhoni Mumbai Indians IPL 2022: महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मूळ आधार मानला जातो. खेळाडू खरेदी करण्यापासून ते मैदानात कसं खेळायचं या साऱ्याचं प्लॅनिंग धोनी करतो. संघात कोणता खेळाडू कोणत्या भूमिकेत खेळेल हे धोनी ठरवतो. धोनीच्या नेतृत्वाखाली CSKने चार वेळा विजेतेपद मिळवले. तसेच IPL 2020 वगळता प्रत्येक वेळी प्ले-ऑफमध्ये धडकही मारली आहे. हाच विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी कदाचित सचिन तेंडुलकरसोबतमुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता होती. पण सचिनमुळेच धोनीची मुंबई संघाकडून खेळण्याची संधी हुकली.
धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे एक समीकरण बनवलं आहे. धोनीशिवाय CSK ही कल्पनाही कोणी करू शकत नाहीत. पण IPL च्या पहिल्या लिलावात धोनी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये जाऊ शकला असता. पण सचिनमुळे या मुंबईने धोनी विकत घेण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला संघात घेत यशस्वी संघ तयार केला.
२००८ साली जेव्हा IPL सुरू होणार होतं त्यावेळी प्रत्येक संघ आपापला 'आयकॉन खेळाडू' निवडत होता. मुंबई इंडियन्स संघाला सचिन तेंडुलकर संघात हवा होता. पण आयकॉन खेळाडूचा नियम असा होता की संघातील सर्वात महागड्या खेळाडूपेक्षा आयकॉन खेळाडूला १० टक्के जास्त रक्कम द्यावी लागेल. धोनी कोणत्याच संघाचा आयकॉन खेळाडू नव्हता. त्यामुळे त्याच्या बोलीबाबत CSKचे मालक श्रीनिवासन यांनी सांगितलं की, मुंबईला धोनीला संघात घ्यायचं होतं पण एका मर्यादेनंतर त्यांना धोनीचा विचार सोडावा लागला.
"धोनीवर जेव्हा बोली लावण्यास सुरूवात झाली तेव्हा मुंबई आणि चेन्नई यांच्यात शेवटपर्यंत चुरस रंगली. धोनीवर १.५ मिलियनची बोली लावण्यात आली. त्यावेळी आयकॉन खेळाडूच्या नियमाची मुंबईला आठवण आली. जर धोनीला १.५ मिलियनच्यापुढे बोली लावून विकत घेतले तर सचिनला किमान १० टक्के जास्त म्हणजे १.६५ मिलियन द्यावे लागले असते. त्यावेळी संघाकडे एकूण रक्कमच ५ मिलियन इतकी होती. त्यामुळे दोन खेळाडूंवर अर्धे पैसे घालवणं मुंबईला परवडणारं नव्हतं. त्यामुळे मुंबईने बोलीतून माघार घेतला", अशी आठवण श्रीनिवासन यांनी सांगितली होती.
Web Title: MS Dhoni was not purchased by Mumbai Indians because of Sachin Tendulkar Here is the reason IPL 2022 Mega Auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.