MS Dhoni: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने IPL-2023 चे विजेतेपद पटकावले. चेन्नईला हे विजेतेपद मिळवून देण्यात सिनियर फलंदाज अंबाती रायडूने महत्त्वाची भूमिका बजावली. पण रायुडूने IPL नंतर भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रायडूच्या निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच आता स्वतः धोनीने एका अभिनेत्याला चेन्नई सुपर किंग्समध्ये येण्याचे आवाहन केले.
क्रिकेटवर राज्य केल्यानंतर आता धोनी फिल्मी दुनियेत हात आजमावत आहे. धोनीने त्याच्या नावावर एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून, तमिळ चित्रपट LGM हा त्याच्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने धोनीने तमिळ चित्रपट अभिनेत्याला चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले.
'या' अभिनेत्याला आमंत्रणचित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने धोनी खूप मस्ती करताना दिसला. यावेळी तमिळ अभिनेता योगी बाबूने धोनीला विचारले की, चेन्नई सुपर किंग्समध्ये त्याच्यासाठी जागा आहे? त्यावर धोनी म्हणाला की, रायडू निवृत्त झाला आहे, त्यामुळे संघातील त्याची जागा रिक्त आहे. याबाबत संघ व्यवस्थापनाशी बोलून सांगेन. यानंतर धोनी म्हणाला की, योगी बाबू चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे त्याला खेळण्यासाठी वेळ काढावा लागेल. गोलंदाजही खूप वेगवान गोलंदाजी करतात, त्यामुळे दुखापतही होऊ शकते. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तामिळनाडूने मला दत्तक घेतलेआयपीएल सुरू झाल्यापासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. या संघाने पाच वेळा आयपीएलजेतेपद जिंकले आहे. तामिळनाडूचे लोक धोनीला खूप मानतात आणि हे दृश्य स्टेडियममध्येही पाहायला मिळते. धोनीही तमिळनाडूतील लोकांना आपलं मानतो. त्यामुळेच त्याने चित्रपट निर्मितीची सुरुवात तमिळ चित्रपटापासून केली आहे.