MS Dhoni Wife Sakshi Photo: महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा

साक्षी सध्या CSKच्या सामन्यांनाही हजेरी लावत नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:36 PM2022-04-20T17:36:18+5:302022-04-20T17:37:45+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni wife Sakshi Dhoni pregnant again or not Instagram Post Photo goes viral on Social media IPL 2022 Mumbai Indians vs CSK | MS Dhoni Wife Sakshi Photo: महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा

MS Dhoni Wife Sakshi Photo: महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Wife Sakshi Pregnant, Viral Photo: सध्या IPL 2022 चा मोसम सुरू आहे. चाहत्यांना दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या मोसमात जरी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मागील मोसमाप्रमाणे अप्रतिम कामगिरी करू शकलेला नसला, तरी संघातील खेळाडू या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, CSKचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा बाबा होणार असल्याची बातमी चर्चेत आहे. त्याची पत्नी साक्षी धोनी हिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरून या चर्चांनी जोर धरला आहे.

धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. सर्व क्रिकेटपटूंच्या पत्नी आयपीएलमध्ये त्यांच्यासोबत राहतात, परंतु यंदा धोनीची पत्नी म्हणजेच साक्षी सीएसकेला सपोर्ट करताना किंवा चिअर करताना अजून तरी दिसलेली नाही. दरवर्षी ती CSKच्या स्टँडमध्ये असते, पण यंदा ती तिथे नसल्याने काही चर्चा सुरू होत्याच. २०२१च्या आयपीएल फायनलनंतरही अशा चर्चांना उधाण आलं होतं. तशातच धोनीची पत्नी साक्षी हिने चिंचं, बोरं असा एक फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. साक्षीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चिंचे, बोरांचा एक फोटो पोस्ट केला. तो फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज लावला की धोनी आणि साक्षी पुन्हा एकदा आई-वडील होणार आहेत. साक्षीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी अशा कमेंट केल्या आहेत आणि त्याच वेळी तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. त्यांच्या संघाने आतापर्यंत ६ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि २ गुणांसह ते गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहेत. सीएसकेचा पुढील सामना २१ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत १०व्या क्रमांकावर असून त्यांनी या हंगामात एकही सामना जिंकलेला नाही. यंदा पहिल्यांदाच चेन्नईचा संघ रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली मुंबईशी दोन हात करणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या वर्षी चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर यावर्षी IPL सुरू होण्यापूर्वी धोनी कर्णधारपदाची जबाबदारी सोडली.

Web Title: MS Dhoni wife Sakshi Dhoni pregnant again or not Instagram Post Photo goes viral on Social media IPL 2022 Mumbai Indians vs CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.