Join us  

MS Dhoni in Team India : टीम इंडियाच्या मदतीसाठी महेंद्रसिंग धोनीची IPLमधून निवृत्ती?; BCCI राहुल द्रविडचा भार हलका करणार

MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:45 AM

Open in App

MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे. विराट कोहलीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवलं गेलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारत जिंकेल अशी चर्चा होती, परंतु त्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरले. भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला.  ICC स्पर्धांमधील अपयशाचं कोडं सोडवण्यासाठी मागील वर्ल्ड कप स्पर्धेत BCCI ने महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) संघासोबत पाठवले होते, परंतु तेव्हा तर साखळीतच आपण गारद झालो. आता BCCI पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे आणि २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी MS Dhoni कडे मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू केली आहे.

IPL 2023 Retention List : धक्कादायक! स्टार खेळाडूंना घरचा रस्ता, Mini Auction साठी फ्रँचायझींची संभाव्य लिस्ट समोर

टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2023) पुढील पर्वानंतर  निवृत्ती घेणार असल्याचे समोर येत आहे. त्याच्या निवृत्तीमागे BCCI कडून दिली जाणारी जबाबदारी असल्याचेही सांगितले जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार BCCI माजी कर्णधाराला पुन्हा एकदा टीम इंडियात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीचा भार राहुल द्रविडवर असल्याने त्याच्यावर प्रचंड वर्क लोड आहे आणि याची जाण BCCI ला आहे. त्यामुळेच आता प्रशिक्षकाच्या जबाबदारीचेही विभाजन करण्याचा विचार सुरू आहे. महेंद्रसिंग धोनीकडे ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी सोपवून खेळाडूंची कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न बीसीसीआयचा आहे.  या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियात बरेच बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, दिनेश कार्तिक आदी सीनियर्सना आता ट्वेंटी-२० संघापासून दूर ठेवण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यात २०२४च्या वर्ल्ड कपचा विचार लक्षात घेता युवा खेळाडूंचा संघ तयार करण्यावर भर असल्याची चर्चा आहे आणि त्यांचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येणार आहे. हार्दिक व धोनी यांच्यातलं बॉडिंग फार चांगले आहे आणि त्यामुळेच धोनीला टीम इंडियाचा संचालक ( MS Dhoni Director of T20 Cricket) म्हणून  नियुक्त केले जाऊ शकते. धोनीच्या अनुभव व कौशल्य गुण  युवा खेळाडूंना शिकता यावे यासाठी BCCI ची धडपड सुरू आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२२बीसीसीआयट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२राहुल द्रविड
Open in App