मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. कोहलीच्या नेतृत्वावर, तर धोनीच्या स्पर्धेतील कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची आणि धोनीनं निवृत्ती स्वीकारायची मागणी होत आहे. आगामी वेस्ट इंडिज मालिकेत धोनीचा संघात समावेश करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विंडीज दौऱ्यावर जात नसला तरी धोनी निवृत्ती घेईल असे नाही, तर त्याच्याकडे एक नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'
2011मध्ये भारताचा वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपविणारा धोनी स्थित्यंतराच्या फेझमध्ये असलेल्या भारतीय संघाला मदत करणार आहे. धोनी हा परदेश दौऱ्यात आणि घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेत यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती नसणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंत आता संघाचा सदस्य असणार आहे. पण, जोपर्यंत पंत पूर्णपणे जबाबदारी स्वीकारण्यात सक्षम होत नाही, तोपर्यंत धोनी त्याला मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.
पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का?
धोनी अंतिम अकराचा सदस्य नसेल, असे स्पष्ट करताना सूत्रांनी सांगितले की,''धोनीनं स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे निवृत्तीच्या प्रश्नावर तो 'केव्हा' च्या जागी 'काय' असा प्रतिप्रश्न करू शकतो. तो निवृत्ती घेईल, पण एवढी घाई कशाला. धोनी संघाच्या 15 सदस्यांमध्ये असेल, परंतु त्याला अंतिम 11मध्ये खेळण्यात संधी मिळणार नाही.''
विंडीज दौऱ्यासाठी दिनेश कार्तिकचाही संघात समावेश केला जाऊ शकतो, परंतु तो संघात कोणत्या भूमिकेसाठी योग्य आहे, याचा निर्णय निवड समिती घेईल. 34 वर्षीय कार्तिकला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, धोनीला पर्याय म्हणून त्याचा विचार केलेला नाही. पंतला पुढील वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यानं त्याची प्रतिभा सिद्ध केलेली आहे, परंतु काही त्रुटी आहेत आणि त्यावर काम करण्याची गरज आहे. त्यासाठी एका वर्षाचा कालावधी पुरेसा आहे.