धोनीचे मोठेपण... स्वत:च्या नावाच्या पेव्हेलियनचे उद्धाटन नाकारले

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नॉर्थ ब्लॉकला धोनीचे नाव द्यायचे, हा निर्णय घेण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:11 PM2019-03-07T16:11:09+5:302019-03-07T16:11:30+5:30

whatsapp join usJoin us
ms Dhoni's dignity ... rejected the opening of the pavilion of his own name | धोनीचे मोठेपण... स्वत:च्या नावाच्या पेव्हेलियनचे उद्धाटन नाकारले

धोनीचे मोठेपण... स्वत:च्या नावाच्या पेव्हेलियनचे उद्धाटन नाकारले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी हा फक्त खेळाडू म्हणून मोठा नाही तर माणूस म्हणूनही आहे. बऱ्याच जणांना ग्लॅमर आपलेसे वाटते. पण धओनी मात्र जसा भारतीय संघात येण्यापूर्वी विनम्र होता, तसाच अजूनही आहे. या गोष्टीचा प्रत्यय रांचीमध्ये आला. कारण रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये धोनीचे नाव पेव्हेलियनला देण्यात आले आहे. या पेव्हेलियनचे उद्धाटन धोनीच्या हस्ते व्हावे, असे बऱ्याच जणांन वाटत होते. पण धोनीने मात्र विनम्रतेने या गोष्टीला नकार दिल्याची बाब समोर आली आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय लढती जिंकल्या आहेत. आता रांचीमध्ये होणारी तिसरी लढत भारताने जिंकली तर त्यांना पाच सामन्यांच्या मालिकेत विजय आघाडी घेता येऊ शकते. त्यामुळे भारताने रांचीमध्ये गुरुवारी कसून सराव केल्याचे पाहायला मिळाले.
 
रांचीलामधील जेएससीएचे सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले की, " गेल्यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नॉर्थ ब्लॉकला धोनीचे नाव द्यायचे, हा निर्णय घेण्यात आला होता. पण धोनीने मात्र उद्धाटन करायला नकार दिला. त्यानंतरही आम्ही धोनीला आग्रह केला. त्यावर धोनी विनम्रतेने म्हणाला की,' दादा अपने ही घर में क्या उद्घाटन करना.' धोनी हा पुर्वीसारखाच विनम्र आहे, याचा प्रत्यय आम्हाला पुन्हा एकदा आला."

धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान
रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. भारताचा तिसरा सामना रांचीला होणार आहे. रांचीला आल्यापासून धोनी एकदम मस्तीमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. कारण हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले. आता तर धोनीने टीम इंडियाला  'लिट्टी-चोखा' पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.
बुधवारी रात्री धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पार्टीमध्ये खास पदार्थ होता तो 'लिट्टी-चोखा'. उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये 'लिट्टी-चोखा'हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.

जेव्हा धोनीचे रांचीमध्ये आगमन होते तेव्हा
 भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: ms Dhoni's dignity ... rejected the opening of the pavilion of his own name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.