India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती देत देशसेवेला प्राधान्य दिले आहे. तो जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पंधरा दिवस पहारा देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 02:02 PM2019-08-03T14:02:29+5:302019-08-03T14:03:07+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni's experience always crucial but it's time for Rishabh Pant to unleash his potential: Virat Kohli | India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली

India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती देत देशसेवेला प्राधान्य दिले आहे. तो जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पंधरा दिवस पहारा देणार आहे. त्यामुळे धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली. वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळला जाणार आहे. धोनीच्या अनुपस्थितीत यष्टिमागे रिषभ पंत जबाबदारी पार पाडणार आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत कॅप्टन विराट कोहलीनं व्यक्त केले. 

भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 सामना कधी व कुठे पाहाल, जाणून घ्या सर्व माहिती!

धोनीच्या भविष्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. 38 वर्षीय धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेईल अशी शक्यता वर्तवण्यात योत होती, परंतु त्यानेही याबाबत स्पष्ट मत मांडलेले नाही. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यानुसार पंतला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीकडे सोपवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत अद्यापप बीसीसीआयने ठोस पाऊल उचललेले नाहीत.

भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज?
 

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत!

''आंतरराष्ट्रीय स्तरावर रिषभ पंतला गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच योग्य संधी आहे. त्याच्याकडे प्रचंड कौशल्य आहे, परंतु त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करावी अशी सर्वांची इच्छा आहे. धोनीचा अनुभव हा संघासाठी नेहमीच महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. पण, त्याच्या अनुपस्थितीत पंतला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे," असे कोहलीनं सांगितले.

तीन ट्वेंटी-20 मालिकेतील पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे होणार आहेत.''या खेळाची जगभरात प्रसिद्धी होतेय हे महत्त्वाचे आहे. फ्लोरिडात सामना खेळवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. 15 ते 20 हजार लोकांना काहीतरी नवीन खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. आशा करतो की भविष्यात येथील लोकांचा या खेळाप्रतीचा रस वाढेल,'' असेही तो म्हणाला. 

पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?

भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य

Web Title: MS Dhoni's experience always crucial but it's time for Rishabh Pant to unleash his potential: Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.