MS Dhoni’s first look as Atharva : महेंद्रसिंग धोनी बनला योद्धा; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील पौराणिक कथा, Video

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni’s first look as Atharva ) याच्या ग्राफिक कांदबरी 'Atharva: The Origin' चा पहिला लूक बुधवारी रिलीज करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:15 PM2022-02-02T20:15:53+5:302022-02-02T20:16:39+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni’s first look as Atharva in mythological sci-fi series revealed, watch video | MS Dhoni’s first look as Atharva : महेंद्रसिंग धोनी बनला योद्धा; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील पौराणिक कथा, Video

MS Dhoni’s first look as Atharva : महेंद्रसिंग धोनी बनला योद्धा; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील पौराणिक कथा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni’s first look as Atharva ) याच्या ग्राफिक कांदबरी 'Atharva: The Origin' चा पहिला लूक बुधवारी रिलीज करण्यात आला. रमेश थामिलमणी हे या कादंबरीचे लेखक आहेत. Dhoni Entertainment ने पौराणिक Si-Fi वेब सीरिज तयार केली आहे.

महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या फेसबूकपेजवर या कादंबरीचा पहिला लूक रिलीज केला. त्यात धोनी एका योद्ध्याच्या अवतारात दिसत आहे. २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा धोनी आता नव्या रुपात दिसणार आहे. २०२०मध्ये या ग्राफिक कादंबरीची घोषणा करण्यात आली होती. धोनीची पत्नी साक्षी ही Dhoni Entertainmentची व्यवस्थापकीय संचालक आहे. ही मालिका थरारक असेल असे तिने सांगितले होते. Dhoni Entertainmentने २०१९मध्ये Roar of the Lion ही डॉक्युमेंट्री आणली होती. 

पाहा व्हिडीओ...

धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात  ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३  धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.
 

Web Title: MS Dhoni’s first look as Atharva in mythological sci-fi series revealed, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.