भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019पासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती अन् शनिवारी स्वातंत्र्य दिनी धोनीनं निवृत्तीची घोषणा केली. भारतीय धोनीनं शनिवारी सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. सर्वांना माहित्येय की धोनी भारतीय रेल्वेत कामाला होता, परंतु क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं नोकरी सोडली. अथक मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर धोनीनं भारतीय संघात एन्ट्री मिळवली अन् आज निवृत्त होताना तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानं भारताला दोन वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. आज त्याची नेटवर्थ 760 कोटी आहे. पण, त्याचा पहिला पगार किती होता, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.
निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video
''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. धोनी सुरुवातीला महिन्याला 3050 रुपये पगार घ्यायचा अऩ् आज तो 760 कोटींचा धनी आहे.
क्रिकेटशिवाय धोनीची अनेक क्षेत्रात केलीय गुंतवणूक..
- हॉटेल - धोनीची पत्नी साक्षीनं हॉटेल मॅनेजमेंटचा केलं आहे आणि हॉटेल्स इंडस्ट्रीतही धोनीनं गुतवणुक केली आहे. झारखंड येथे कॅप्टन कूल धोनीचं स्वतःचं हॉटेल आहे आणि त्याचं नाव माही रेजीडेंसी असं आहे.
- हॉका संघ - हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रेंजर्स संघाचे मालकी हक्क धोनीकडे आहेत. 2014मध्ये या संघानं रांची रहिंहो या संघाची जागा घेतली होती.
- फुटबॉल क्लब - इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी संघातही गुंतवणूक केली आहे. तो या संघाचा सहमालक आहे.
- एंटरटेनमेंट - धोनीनं गतवर्षी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्यानं उघडली असून नुकतंच त्यानं मुंबईत ऑफिस सुरु केलं आहे. त्याच्या या कंपनीचा पहिला प्रोजेक्ट हा 'द रोर ऑफ द लायन' हा होता.
- फॅशन - फॅशनच्या दुनियेतही धोनीनं त्याचा स्वतःचा ब्रँड आणला आहे. सेव्हन या लाईफ स्टाईल ब्रँडमध्ये त्यानं गुंतवणुक केली आहे आणि 2016मध्ये त्याचं लाँचिंग झालं. या ब्रँडच्या फुटवेअरचा धोनी मालक आहे.
- रेसिंग टीम - धोनीला बाईक्सची किती क्रेझ आहे ते सांगयला नको. त्यानं साऊतचा सुपरस्टार नागार्जुन याच्यासह सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये माही रेसिंग टीम इंडियाचे मालकी हक्क खरेदी केले आहेत.
- फिटनेस - जगभरात त्याच्या स्पोर्ट्स फिट नावाच्या 200 जीम आहेत.