Shane Watson, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने MS Dhoniचा विश्वासू माणूस पळवला, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! 

IPL 2022, Delhi Capitals : १० संघांमध्ये होणाऱ्या यंदाच्या आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी मेगा ऑक्शनमध्ये तगडे खेळाडू ताफ्यात घेत मजबूत संघंबांधणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:48 AM2022-02-23T09:48:46+5:302022-02-23T09:49:38+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni’s loyalist  Shane Watson set to join as the another Assistant coach of Delhi Capitals in IPL 2022 | Shane Watson, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने MS Dhoniचा विश्वासू माणूस पळवला, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! 

Shane Watson, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने MS Dhoniचा विश्वासू माणूस पळवला, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Delhi Capitals : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या वेळापत्रकाची घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार २६ किंवा २७ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून साखळी फेरीतील सर्व सामने महाराष्ट्रात अन् प्ले ऑफच्या लढती अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहेत. १० संघांमध्ये होणाऱ्या यंदाच्या आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी मेगा ऑक्शनमध्ये तगडे खेळाडू ताफ्यात घेत मजबूत संघंबांधणी केली आहे. आता प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक आदी महत्त्वाच्या गोष्टींकडे फ्रँचायझींनी लक्ष वळवले आहेत. त्यामुळे बरीच खांदेपालट पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) केली असून त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन ( Shane Watson) आता Delhi Capitalsच्या डग आऊटमध्ये दिसणार आहे. DC चे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) याने CSKच्या विश्वासू खेळाडूला आपल्या ताफ्यात येण्यास मनवले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विश्वासू माणूस आता DCच्या कॅम्पमध्ये दिसणार आहे. रिषभ पंत कर्णधार असलेल्या DCचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून वॉटसन काम पाहणार आहे आणि त्याची निवड मोहम्मद कैफच्या जागी होणार आहे.

४० वर्षीय वॉटसनने आयपीएल २०२०नंतर  निवृत्ती घेतली. सलामीवीर वॉटसन हा CSKचा विश्वासू मानला जातो, परंतु आता तो पाँटिंगला मदत करणार आहे.  Cricbuzzने दिलेल्या माहितीनुसार DCचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी वॉटसनचे मन वळवले आणि सहाय्यक प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार केले. वॉटसनच्या नावावर दोन आयपीएल जेतेपदं आहेत. २००८ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून, तर २०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून जेतेपदाचा चषक उंचावला होता.  

दिल्ली कॅपिटल्सचा कोचिंग स्टाफ ( Delhi Capitals Coaching Staff)

  • रिकी पाँटिंग - मुख्य प्रशिक्षक
  • शेन वॉटसन - सहाय्यक प्रशिक्षक
  • अजित आगरकर - सहाय्यक प्रशिक्षक
  • जेम्स होप्स - जलदगती गोलंदाज प्रशिक्षक
  • साबा करिम - टीम स्काऊट व सल्लागार

 

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर ( ६.२५ कोटी), मिचेल मार्श ( ६.५० कोटी), शार्दूल ठाकूर ( १०.७५ कोटी),  मुस्तफिजूर रेहमान ( २ कोटी), कुलदीप यादव ( २ कोटी),  अश्विन हेब्बर ( २० लाख),  सर्फराज खान ( २० लाख), कमलेश नागरकोटी ( १.१० कोटी), के. एस भारत ( २ कोटी), मनदीप सिंह ( १.१० कोटी), खलील अहमद ( ५.२५ कोटी), चेतन साकरिया ( ४.२० कोटी), यश धूल ( ५० लाख), रिपल पटेल ( २० लाख), ललित यादव ( ६५ लाख), रोवमन पॉवेल ( २.८० कोटी), प्रविण दुबे ( ५० लाख), लुंगी एनगिडी ( ५० लाख), विकी ओस्तवाल ( २० लाख), टीम सेईफर्ट ( ५०  लाख). 

Web Title: MS Dhoni’s loyalist  Shane Watson set to join as the another Assistant coach of Delhi Capitals in IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.