भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साली आतापासूनच प्रचंड मेहतन घेताना दिसतोय... आयपीएल २०२३ चे जेतेपद जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराला २०२४ मध्ये खेळणार का, असे विचारले गेले होते. ४१ वर्षीय धोनीची आयपीएल २०२३ ही शेवटची स्पर्धा असल्याची जोरदार चर्चा होती, परंत ४२ व्या वर्षीही धोनी आयीएल खेळताना दिसणार आहे. २०११चा वन डे वर्ल्ड कप विजेत्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवले आहे आणि आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. २०१३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि २००७ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधाराची एकूण मालमत्ता १०५० कोटी इतकी आहे.
महेंद्रसिंग धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता तेव्हा तो बीसीसीआयकडून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडूनही तो सर्वाधिक मानधन घेतो. त्याशिवाय वेगवेगळ्या जाहीराती आणि brand dndorsements मधूनही त्याची छप्परफाड कमाई होते. पण, नुकतंच त्याचं जुनं अपॉइंटमेंट लेटर व्हायरल झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सने २०१२ मध्ये धोनीला दिलेले हे अपॉइंटमेंट लेटर व्हायरल झालं आहे. यामध्ये इंडियन सीमेंट कंपनीत त्याची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून झाल्याचे स्पष्ट होतेय. आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी २०१७ मध्ये हे लेटर पोस्ट केले होते. यामध्ये धोनीला महिना १.७ लाख पगार दिल्याचे दिसत आहे.
धोनीने ९० कसोटी सामन्यांत ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यात त्याच्या नावावर १९७७३ धावा आहेत आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १६१७ धावा केल्या आहेत. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३० लाख कमावण्याचे स्वप्न घेऊन क्रिकेटमध्ये आलेला धोनी आज १०४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
Web Title: Ms Dhoni's old job appointment letter resurfaces online, know his mothly salary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.