2011 and 2022 World Cup Coincidences : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच्या एका रविवारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने फेसबूकवरू लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली. शनिवारीच धोनीने हे ट्विट केले होते आणि त्यामुळे त्याच्या घोषणेकडे सर्वांचे कान टवकारले होते. पण, धोनी आला अन् ती प्रेस कॉन्फरन्स फुसकी निघाली. Oreo बिस्कीटाची जाहीरातीसाठी धोनीचा हा आटापीटा होता. त्यावेळी त्याने २०११ व २०२२चा वर्ल्ड कप आणि ओरियो यांच्यातला खास योगायोग सांगताना भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल, असे भाकित केले होते. पण, तेव्हा त्याला अनेकांनी ट्रोल केले. पण, आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला आहे आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. २०११मध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात घडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच आता धोनीचे ते बोल खरे ठरतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
न्यूझीलंड, इंग्लंड, भारत व पाकिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रुप १ मधून न्यूझीलंडने अव्वल स्थानासह, तर इंग्लंडने दुसऱ्या क्रमांकासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप २ मधून भारत व पाकिस्तान हे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून दुसऱ्या स्थानासह सेमीत प्रवेश केला, तर भारत झिम्बाब्वेला नमवून टेबल टॉपर होत उपांत्य फेरीत जाईल. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशा उपांत्य फेरीच्या लढती अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला होतील. उपांत्य फेरीत भारत व पाकिस्तान यांनी बाजी मारली तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल India vs Pakistan अशी होईल आणि त्याचीच क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
२०११च्या वर्ल्ड कपमध्ये
- भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव
- आयर्लंडचा धक्कादायक निकाल अन् इंग्लंड पराभूत
- ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश
- भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत
२०२२च्या वर्ल्ड कपमध्ये
- भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव
- आयर्लंडचा धक्कादायक निकाल अन् इंग्लंड पराभूत
- ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश
- भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"