मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनीला आतापर्यंत आपण खेळलो नाही, याचा पश्चाताप झालेला नाही तर त्याने यावेळी एक मोठा खुलासा केला आहे.
विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारली होती. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. या विश्वचषकाबाबत धोनीने एक मोठा खुलासा केला आहे.
न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर संघात बेबनाव असल्याचे पाहायला मिळाले होते. भारताचा उपकर्णधार आणि फॉर्मात असलेला रोहित शर्मा हा नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. रोहित हा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनावर नाराज होता, असे वृत्त काही जणांनी प्रसारीत केले होते. त्याचबरोबर रोहित संघाबरोबर मायदेशात परतला नव्हता. धोनीने या विश्वचषकाबाबत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे रोहित, कोहली आणि लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी संघाला जिंकवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. धावांचा पाठलाग करताना जडेजा धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण फटकेबाजीच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्यानंतर धोनीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पण दुर्दैवीपणे धोनी धावचीत झाला आणि भारताच्या हातून सामना निसटला. या सामन्याबाबत धोनीने खुलासा केला आहे.
धोनीला या सामन्यातील आपल्या धावचीत होण्याचा पश्चाताप झाला. याबाबत तो म्हणाला की, " या सामन्यापूर्वीच्या लढतीतही मी धावचीत झालो होतो. त्यामुळे उपांत्य सामन्यात मी पुन्हा धावचीत झालो तेव्हा मी निराश झालो. मी यावेळी उडी मारून क्रीझमध्ये का लवकर पोहोचू शकलो नाही, या गोष्टीचा मला पश्चाताप झाला."
विश्वचषकानंतर आर्मीबरोबर सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. यावेळी त्याने आर्मीतील जवानांचे काम जवळून पाहिले आहे आणि या गोष्टीचाच फायदा धोनीला यापुढे होणार आहे. धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांनी शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.