स्टम्पमागे धोनीची स्टाईल मारणाऱ्या पंतने सोडला सोपा झेल; कुलदीपने अशी व्यक्त केली नाराजी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत धोनीची स्टाईल मारत होता. पण यावेळी एक सोपा झेल पंतने सोडल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 03:14 PM2019-12-22T15:14:09+5:302019-12-22T15:17:47+5:30

whatsapp join usJoin us
ms Dhoni's style done behind the stumps by Rishabh Pant and dropped easy catch | स्टम्पमागे धोनीची स्टाईल मारणाऱ्या पंतने सोडला सोपा झेल; कुलदीपने अशी व्यक्त केली नाराजी

स्टम्पमागे धोनीची स्टाईल मारणाऱ्या पंतने सोडला सोपा झेल; कुलदीपने अशी व्यक्त केली नाराजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कटक : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा महेंद्रसिंग धोनीची स्टाईल मारत असल्याचे आपण नेहमी पाहतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत धोनीची स्टाईल मारत होता. पण यावेळी एक सोपा झेल पंतने सोडल्याचे पाहायला मिळाले.

Image result for rishabh pant dropped catches

वेस्ट इंडिजचा रोस्टन चेसने भोपळाही फोडला नव्हता. त्यावेळी फिरकीपटू कुलदीप यादवचा एक चेंडू चेसच्या बॅटची कडा घेऊन  पंतच्या दिशेने गेला. हा एकदम सोपा झेल होता. त्यामुळे पंत हा झेल सहज पकडेल, असे वाटत होते. पण पंतने मात्र हा सोपा झेल सोडला. यावेळी कुलदीपला आपली निराशा लपवता आली नाही.

नवदीप सैनीला नक्कीच आठवेल पहिलाच चेंडू, पण असं घडलं तरी काय...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली. पण या सामन्यात सैनीने टाकलेला पहिला चेंडू सैनीला नक्कीच आठवणीत राहील. पण नेमकं असं घडलंय तरी काय...

वेस्ट इंडिजचा इव्हिन लुईस हा सैनीच्या पहिल्या चेंडूचा सामना करणार होता. सैनीने चेंडू टाकला आणि लुईसने हा चेंडू थेट सीमारेषे पार धाडला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर सैनीने चौकार दिला. त्यामुळे हा पहिला चेंडू सैनीच्या चांगलाच लक्षात राहील, असे म्हटले जात आहे.

नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजी का स्वीकारली नाही, सांगतोय कर्णधार विराट कोहली
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने प्रथम फलंदाजी का केली नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.

आतापर्यंत कोहलीला जास्त नाणेफेक जिंकता आलेल्या नाहीत. पण तिसऱ्या सामन्यात मात्र कोहलीने नाणेफेक जिंकल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यावर कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. यावेळी भारतीय संघात एकच बदल करण्यात आल्याचे कोहलीने सांगितले.

नाणेफेकीनंतर कोहली म्हणाला की, " कटकची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगला आहे. सध्या थोडे धुके त्यामुळे रात्री चांगले दव पडेल. दव पडल्यावर फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. त्यामुळे मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे." 


वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही भारताच्या एका खेळाडूवर अन्याय करण्यात आल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे. संघात घेऊन एकही सामना आतापर्यंत या खेळाडूच्या नशिबी आलेला नाही.

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. पंतला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. पण तरीही पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे. पण गेल्या तीन मालिकांपासून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

ट्वेन्टी-२० विश्वचषक पाहता पंतला संधी देण्यात येत आहे. पण पंतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत पंत हा नापास ठरला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पंतने काही धावा केल्या, पण त्याला शतकाची संधी असूनही त्याला सोने करता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात तरी संजूला स्थान मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण या सामन्यातही संजूला संघात स्थान देण्यात आलेले नाही.


तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला मिळाले स्थान आणि कोणाला डच्चू, जाणून घ्या...
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्यात आले. सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली. 

भारताच्या संघात यावेळी फक्त एकच बदल पाहायला मिळाला. त्यामुळे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि शार्दुल ठाकूर या महाराष्ट्रातील खेळाडूंनी संघात आपले स्थान कायम ठेवले आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. पण वेस्ट इंडिजने या सामन्यात मात्र कोणताही बदल केलेला नाही.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात नवीन चेहरा, विराट कोहलीने दिली पदार्पणाची कॅप
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात एका नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने या खेळाडूना पदार्पणाची कॅप दिल्याचे पाहायला मिळाले.

कटकच्या खेळपट्टीवर नवीन वेगवान गोलंदाजाला यावेळी संधी देण्याचे भारताने ठरवले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.

Web Title: ms Dhoni's style done behind the stumps by Rishabh Pant and dropped easy catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.